मकर संक्रांत स्पेशल: चिमुकलीसाठी घ्या काळ्या रंगाचा खणाचा फ्रॉक - १५० रुपयांत मिळणारे ५ ट्रेंडिंग पॅटर्न, दिसेल बाहुलीसारखी
Updated:January 5, 2026 09:42 IST2026-01-04T18:00:00+5:302026-01-05T09:42:59+5:30
Makar Sankranti dress for baby girl: black khan frock for baby girl: baby girl ethnic wear: मुलींसाठी पाहूया खणाच्या फ्रॉकचे ५ पॅटर्न

मकरसंक्रांतीत तिळगूळ, पतंग, सणासुदीची लगबग आणि खास पारंपरिक कपडे हे आलेच. मोठ्यांबरोबरच घरातल्या चिमुकल्या मुलींसाठीही या सणाला खास ड्रेस घालायची प्रत्येक आईची इच्छा असते.हल्ली पारंपरिक आणि ट्रेंडी असा एक ड्रेस प्रकार म्हणजे काळ्या रंगाचा खणाचा फ्रॉक. (Makar Sankranti dress for baby girl)
कमी बजेटमध्ये, दिसायला रॉयल आणि सणासाठी परफेक्ट असा हा फ्रॉक मकरसंक्रांतीसाठी खूपच लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे हे सुंदर फ्रॉक्स फक्त १५० रुपयांच्या आत सहज मिळू शकतात. यावर विविध रंगांची नक्षी देखील केलेली असते. पाहूया खणाच्या फ्रॉकचे ५ पॅटर्न. (black khan frock for baby girl)
सिंपल खण फ्रॉक विथ गोल्डन बॉर्डर. कमी कापड, हलका डिझाइन आणि मकरसंक्रांतीच्या सणासाठी अगदी योग्य. हा फ्रॉक साधारणत: दीडशे ते दोनशे रुपयांच्या आत मिळू शकतो.
काळ्या खणाचा फ्रॉक विथ कलरफुल प्रिंट्स. यात पतंग, फुलं किंवा पारंपरिक मोटिफ्स असलेले हे फ्रॉक्स मुलींना खूपच गोंडस लूक देतात.
फ्रॉक विथ कॉटन जॅकेट स्टाईल. हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत हा पॅटर्न उपयुक्त ठरतो आणि दिसायलाही हटके वाटतो.
लेयरड खण फ्रॉक. हलक्या लेअर्समुळे फ्रॉकला थोडासा फुललेला, प्रिन्सेससारखा लूक मिळतो. कमी दागिन्यांसोबत, छोट्या माळेसोबत किंवा फुलांच्या क्लिपसह हा फ्रॉक अजूनच सुंदर दिसतो.
ब्लॅक खण फ्रॉक विथ टसल किंवा लेस डिटेलिंग. कमी किमतीतही हा फ्रॉक खूपच स्टायलिश दिसतो. सणाच्या दिवशी मुले सतत खेळत असतात, त्यामुळे आरामदायक कपडे खूप महत्त्वाचे ठरतात.