१००० रूपयांच्या आतल्या आरी वर्क डिजाईन्स; १० सिंपल, युनिक वर्क पॅटर्न्स, ब्लाऊज उठून दिसेल
Updated:October 30, 2025 11:39 IST2025-10-30T11:15:17+5:302025-10-30T11:39:14+5:30
Low Budget Aari Work Ideas : ब्लाऊजच्या फक्त गळ्यावर किंवा बाहीच्या कडेला साधे, लहान बुटी किंवा बॉर्डर असलेले डिजाईन्स निवडा.

आजकाल आरी वर्क ब्लाऊजचा नवीन ट्रेंड खूपच गाजत आहे. सणासुधीला किंवा खास कार्यक्रमांना आरी वर्क केलेल्या ब्लाऊजला बरीच मागणी असते. आरी वर्क ब्लाऊज पॅटर्न शिवण्यासाठी तुम्ही काही या डिजाईन्स ट्राय करू शकता.( 10 Affordable Aari Work Ideas Blouse Designs)
आरी वर्क करून घेण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात म्हणून काहीजणी आरी वर्क करून घेत नाहीत. कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा आरी वर्क करून घेता येते. (Blouse Designs Aari Work Blouse)
५०० रूपयांपासून सुरूवात होत असून ५००० रूपयांपर्यंत या डिजाईन्स असतात. आरी वर्क डिजाईन्समुळे साडीला रिच लूक मिळतो आणि साडी सुंदर दिसते.
साध्या चेन स्टिटचा वापर करून बॉर्डर किंवा लहान पॅटर्न तयार केल्यास खर्च कमी येतो.
ब्लाऊजच्या फक्त गळ्यावर किंवा बाहीच्या कडेला साधे, लहान बुटी किंवा बॉर्डर असलेले डिजाईन्स निवडा.
संपूर्ण ब्लाऊजवर भरगच्च काम करण्याऐवजी मुख्य भागावर फोकस केल्यास कमी बजेटमध्ये काम होतं.
अगदी लहान आकाराचे मणी किंवा सिक्विन्सचा वापर फक्त हायलाईटसाठी करा.
बाजारात आरी वर्कचे सुंदर, रेडीमेड पॅचेस मिळतात हे पॅचेस डिजाईन्सच्या मुख्य भागावर लावून बारीचं काम साधं ठेवल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचते.
या प्रकारचं वर्क हवं असेल तर याची किंमत १५०० ते १८०० रूपयांपर्यंत असेल
ब्लाऊजला तुम्ही व्हाईट स्टोन्ससुद्धा लावून घेऊ शकता.