Wedding Special: लग्नसोहोळ्यांसाठी स्पेशल कलांजली बुट्टा पैठणी; १० सुंदर रंग-एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊजसुद्धा मिळेल
Updated:February 2, 2026 17:58 IST2026-02-01T13:20:50+5:302026-02-02T17:58:20+5:30
2026 Wedding Special Blouse Kalanjali Butta Paithani : ही जोडी जुन्या परंपरेला अधुनिक फॅशनची जोड देते. ज्यामुळे तरूणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच हा पेहराव आवडतो

कलांजली पैठणी (Kalanjali Butta Paithani) आणि एम्ब्रॉयडरी ब्लाऊज यांमधील मिलाफ हा भारतीय पारंपारीक वस्त्रांमधील सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. (Kalanjali Paithani With Aari Work Blouse)
कलांजली पैठणी ही तिच्या समृद्ध विणकामासाठी ओळखली जाते. जेव्हा या साडीसोबत एम्ब्रॉडरी केलेला ब्लाऊज परिधान केला जातो तेव्हा त्या साडीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. (Kalanjali Paithani Designs)
पैठणीवर प्रामुख्यानं मोर, कमळ, राजहंस, फुलांची नक्षी असते. एम्ब्रॉडरी ब्लाऊजमध्येही यात नक्षीचा वापर केला जातो आणि सुसुत्रता आणली जाते.
एम्ब्रॉडरी ब्लाऊजवर प्रामुख्यानं जरीकाम, जरदोरी, रेशीम, धाग्यांचे काम आणि मण्यांचा वापर केला जातो. यामुळे ब्लाऊजचा एक हेवी आणि डिझायनर लूक मिळतो.
या साड्यांचे रंग अतिशय गडद आणि आकर्षक असतात. ब्लाऊजवर साडीच्या काठांच्या रंगाची किंवा साडीतील विरोधाभाससी रंगांची एम्ब्रॉयडरी केल्यामुळे तो अतिशय उठावदार दिसतो.
लग्नकार्य किंवा मोठ्या सण-समारंभांसाठी कलांजली पैठणी विथ एम्ब्रॉयडरी ब्लाऊज महिलांची पहिली पसंती असते.
ही जोडी जुन्या परंपरेला अधुनिक फॅशनची जोड देते. ज्यामुळे तरूणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच हा पेहराव आवडतो
ब्लाऊजच्या गळ्यावर किंवा बाहीवर केलेले नाजूक एम्ब्रॉयडरीचे काम साडीच्या पदराची मेळ खाणारे असते. जे संपूर्ण व्यक्तीमत्वाला एक वेगळीच शान देते.
कलांजली पैठणीसोबत जेव्हा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज घातले जाते तेव्हा त्यावर ठुशी कोल्हापूरी साज किंवा चिंचपेटी यांसारखे पारंपारीक दागिने अधिक उठून दिसतात. ब्लाऊजवरील जरदोजी काम आणि सोन्याचे दागिने एकमेकांना पुरक ठरतात.
साडीचा पदर पिनअप करताना किंवा मोकळा सोडताना ब्लाऊजवर केलेले कलाकुसरीचे काम सर्वांचे लक्ष वेधून घेते.