1 / 8आता पुढच्या काही दिवसांत श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण सुरू झाला की त्यापाठोपाठ एकामागे एक सणवार सुरू होतातच. सणावाराच्या दिवसांत हातात घालायला वेगवेगळ्या बांगड्या हव्याच..2 / 8काचेच्या, मेटलच्या बांगड्या नेहमीच्याच. आता यावेळी लाखेच्या बांगड्या पाहा. कारण त्याचे कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात विकायला आले आहेत.3 / 8हे एक सुंदर डिझाईन पाहा. ही बांगडी तुम्ही पारंपरिक कपड्यांवर तर घालू शकताच, पण त्यासोबतच वेस्टर्न वेअर कपड्यांवरही ती छान दिसेल.4 / 8आपल्या कपड्यांना मॅचिंग होणाऱ्या अशा सुंदर ठसठशीत बांगड्या घातल्या की हाताचे सौंदर्य खुलून येते यात वादच नाही.5 / 8ॲण्टीक लूक असणाऱ्या या लाखेच्या बांगड्या पाहा. याचं डिझाईन अतिशय वेगळं असून सध्या त्या खूप ट्रेंडींग आहेत.6 / 8कुंदन वर्क करून सजविण्यात आलेल्या या लाखेच्या बांगड्या हातात खूपच आकर्षक दिसतात.7 / 8खूप बांगड्या घालण्यापेक्षा अशा जाड, मोठ्या बांगड्या घातल्या की लगेचच हात भरून गेल्यासारखा दिसतो.8 / 8लाखेच्या बांगड्यांची एक खासियत म्हणजे त्या दिसायला खूप हेवी वाटत असल्या तरी वजनाला अतिशय हलक्या असतात. त्यामुळे त्या कितीही वेळ तुम्ही आरामात घालून ठेवू शकता.