देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

Published:April 5, 2024 04:37 PM2024-04-05T16:37:25+5:302024-04-05T18:20:14+5:30

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

उन्हाळा सुरू झाला की हमखास आंब्याचे वेध लागतात. कधी एकदा आंब्याची गोडी चाखून बघतो, असं होतं.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

आता आंबा घ्यायचा तर हापूसच घ्यावा, असं अनेकांना वाटतं. त्यासाठी विक्रेते मागतील ती किंमत द्यायलाही अनेक जण तयार असतात. पण हल्ली या बाबतीत खूप फसवणूक वाढली असून कोकणातला हापूस म्हणून चक्क बरेच विक्रेते कर्नाटकी हापूस किंवा केरळी हापूस विकतात.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

आंबा घेताना आपलीही अशी फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी ४ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही देवगड- रत्नागिरीचा हापूस आणि केरळी- कर्नाटकी हापूस यांच्यातला फरक लगेच ओळखू शकाल.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

हापूस आंबा घेताना तो कधीही नुसता वरवर बघून खरेदी करू नका. कारण दिसायला कोकणातला हापूस आणि कर्नाटकी हापूस हे दोन्हीही सारखेच दिसतात. त्यामुळे नेहमी चव घेऊन, आंबा चिरूनच तो खरेदी करा.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

कोकणातला हापूस आंबा हा आतून केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटक- केरळचा हापूस हा पिवळसर रंगाचा असतो.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

कोकणातल्या हापूसचे साल पातळ असते तर कर्नाटकी हापूसचे साल जाडसर असते.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

कोकणातला हापूस हा अतिशय सुगंधी आणि गोड असतो. तर कर्नाटकी हापूसचा सुगंध अगदी कमी असतो. शिवाय तो सपक लागतो.

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

कोकणातला हापूस कधीही कागदी बॉक्समध्ये येत नाही. तो नेहमी लाकडी बॉक्समध्ये घालूनच विक्री केला जातो. कागदी बॉक्समध्ये येणारे आंबे हे कर्नाटक आणि केरळचे असतात.