1 / 7७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने भारतामधल्या काही प्रसिद्ध हॅण्डलूम साड्यांचे प्रकार पाहूया. हॅण्डलूम साड्या म्हणजे अशा साड्या ज्या कित्येक कुशल कारागिरांनी एकत्र येऊन हाताने विणून तयार केलेल्या असतात.2 / 7हॅण्डलूम साड्यांमध्ये वेगवेगळे १२ प्रकार मिळतात. त्यापैकी काही लोकप्रिय प्रकार आता पाहुया.. 3 / 7हॅण्डलूम साड्यांपैकी सर्वात महागडा प्रकार म्हणजे हॅण्डलूम सिल्क साडी. बनारसी, पैठणी, कांजीवरम अशा पारंपरिक साड्यांचे प्रकार हॅण्डलूक सिल्क प्रकारात येतात. या साड्यांची श्रीमंती आजही टिकून आहे.4 / 7हॅण्डलूम कॉटन प्रकारात माहेश्वरी, गढवाल, कोटा सारी असे लोकप्रिय प्रकार मिळतात. हल्ली हे प्रकार सिल्क साड्यांमध्येही दिसून येत आहेत.5 / 7हॅण्डलूम लिनन साडी हा प्रकार अतिशय मऊ आणि वजनाला हलका असतो. या साड्या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या भागात तयार केल्या जातात.6 / 7हॅण्डलूम चंदेरी साडी हा प्रकारही अतिशय लोकप्रिय आहे. या साड्या मध्यप्रदेशात तयार होतात. अगदी तलम कपडा ही या साड्यांची ओळख असून आता त्या चंदेरी कॉटन आणि चंदेरी सिल्क या दोन्ही प्रकारात मिळत आहेत.7 / 7हॅण्डलूम कलमकारी साडी तरुणींना भुरळ घालते. ऑफिसवेअर, पार्टीवेअर म्हणून ही साडी जास्त निवडली जाते.