1 / 10हळदी- कुंकू हा धार्मिक विधी नसून मराठी संस्कृतीतील एक विशेष सोहळा आहे. मकरसंक्रांतीनिमित्त सर्व सुवासिनींना एकत्र बोलवून त्यांना सन्मानाने हळदी-कुंकू दिला जातो. तसेच या छोट्याशा समारंभातून आपुलकी, नातेसंबंध आणि सौभाग्याच्या शुभेच्छाही दिल्या जातात. (haldi kumkum gifts)2 / 10मकर संक्रांतीपासून हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तिळाचे लाडू, फुलं, पुस्तक हे सर्व काही सेमच असतं पण प्रत्येक घरात वेगळं असतं ते म्हणजे वाण. अगदी बजेटमध्ये वाण शोधत असाल तर पाहूया काही १० पर्याय.(budget haldi kumkum vaan) 3 / 10कुंकवाचा करंड हे कायम उपयोगात येणारे, पारंपरिक आणि सुंदर वाण आहे. सध्या विविध डिझाइन्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याची किंमत साधरणत: १० रुपयांपासून ते अगदी १००- २०० रुपयांपर्यंत पाहायला मिळते. 4 / 10स्वंयपाकघरात रोज वापरता येणारी अशी वाटी. आपण प्लास्टिक किंवा स्टीलची वाटी देऊ शकतो. यातही आपल्याला विविध आकाराच्या आणि काही डिझाइन्सच्या वाट्या पाहायला मिळतील. 5 / 10महिलांना सगळ्यात आवडणारी वस्तू म्हणजे नेलपेट. आपण हे देखील वाण म्हणून देऊ शकतो. यात विविध रंग पाहायला मिळतात. 6 / 10आपण वाण म्हणून चॉकलेटचे मोल्ड किंवा विविध साचे देखील देऊ शकतो. याची किंमत अगदी ४० ते ५० रुपयांपासून सुरु होते. 7 / 10स्काल्प मसाजरसुद्धा वाण म्हणून देता येईल. याची किंमत ५० रुपयांपासून सुरु होते. हा अगदी उपयुक्त असा वाण ठरेल. 8 / 10लसूण किंवा आले खिसण्याची खिसणी देखील वाण म्हणून आपल्याला देता येईल. याची किंमतही ५० रुपयांपासून सुरु होते. 9 / 10आपण महिलांना फूट क्लिनिंग ब्रश देखील देऊ शकतो. हिवाळ्यात बऱ्याच महिलांचे पाय रखरखीत होतात. यावेळी हे मसाजर उपयुक्त ठरेल. 10 / 10नाकावरचे ब्लॅकहेड्स काढायला आणि कॉर्नर क्लिन करण्याचा ब्रश देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. हे देखील ५० रुपयांना आपल्याला मिळेल.