Join us

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर घ्या १ ग्रॅमची सुंदर नथ, ८ मोहक डिझाईन्स- करा नथीचा नखरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 15:06 IST

1 / 9
गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोनं घेण्याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे बहुतांश लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडंफार का असेना पण सोनं आवर्जून घेतात.
2 / 9
सध्या तर सोन्याच्या दराने ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेली आहे. त्यामुळे अशावेळी मुहूर्ताला सोनेखरेदी करायची असेल तर अशा पद्धतीची १ ग्रॅमची नथ तुम्ही घेऊ शकता.
3 / 9
१८ कॅरेट सोन्यातही नथींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या नथीसुद्धा तुलनेने बऱ्याच कमी पैशांत मिळतात.
4 / 9
सध्या तर आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये नथींचे असे कित्येक सुंदर प्रकारही मिळत आहेत.
5 / 9
मोत्याची, सोन्यांच्या मण्यांची नथ आपण नेहमीच पाहातो. थोडं वेगळं डिझाईन पाहिजे असेल तर अशी स्टोन्सची नथ घेऊन पाहा..
6 / 9
नथीचा हा एक आणखी सुंदर आणि खूपच वेगळा प्रकार. सहसा अशी नथ कोणाकडे पाहायला मिळत नाही.
7 / 9
मोराच्या आकाराची नथ तर नेहमीच खूप मोहक वाटते. त्यामुळे अशी एखादी नथ घ्यायलाही हरकत नाही.
8 / 9
मोराच्या नथीचा हा एक आणखी सुंदर प्रकार पाहा..
9 / 9
अशा पद्धतीची नथ तरुण मुलींना विशेष आवडते असं दिसून येतं. पारंपरिक आकाराची नथ नको असेल तर हे एक वेगळं डिझाईन नक्की ट्राय करून पाहा.
टॅग्स : खरेदीगुढीपाडवादागिने