1 / 8गौरी पुजनाच्या दिवशी घरी प्रसादासाठी एखाद्या महिलेला बोलविण्याची प्रथा आहे (gauri Ganpati festival). यावेळी तिची ओटी भरून तिला ब्लाऊजपीस दिला जातो किंवा मग साडी नेसवली जाते. पण यापेक्षा काही वेगळ्या पर्यायांचा विचार तुम्ही करत असाल तर ही घ्या यादी..2 / 8१०० ते १५० रुपयांपर्यंत खूप वेगवेगळ्या बांगड्यांचे डिझाईन्स मिळतात. घरी आलेल्या सवाष्णीला तुम्ही बांगड्या देऊ शकता.(haldi kunku gift for women)3 / 8तुमच्या घरी येणारी महिला कोणता वयोगटातली आहे ते पाहून तिच्यासाठी एखादी आकर्षक पर्सही घेऊ शकता. 4 / 8कुंकवाचा करंडा हा एक पर्यायही चांगला आहे. त्याचे कित्येक प्रकार ऑनलाइन शॉपिंग साईटवर मिळू शकतात.5 / 8टू व्हीलर चालवणारी प्रत्येक जण हल्ली स्टोल वापरते. तुमच्या घरी येणाऱ्या महिलेला छानसा स्टोल विकत घेऊन द्या. तिच्या रोजच उपयोगी पडेल. 6 / 8हल्ली बऱ्याचजणी खोटे मंगळसूत्र वापरतात. खोट्या मंगळसूत्रांचे कित्येक डिझाईन्स अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात. त्याचाही विचार तुम्ही नक्की करू शकता.7 / 8रोजच्या वापरासाठी सुंदर मोत्याचे कानातलेही तुम्ही देऊ शकता.8 / 8मोत्याचा तन्मणी किंवा चिंचपेटीही अगदी बजेटमध्ये मिळू शकते.