Dussehra 2025 : दसऱ्याच्या मुहूर्तावर कमी पैशात खरेदी करा सोन्याचांदीच्या कमी वजनाच्या वस्तू, पाहा मस्त पर्याय
Updated:September 30, 2025 19:52 IST2025-09-29T18:19:12+5:302025-09-30T19:52:54+5:30

दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. यादिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे. आता सध्या सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत. पण तरीही दसऱ्याचा मुहूर्त साधून तुम्हाला सोन्याचांदीच्या नाजूक वस्तूंची खरेदी करायची असेल तर पुढील काही पर्याय नक्कीच तुम्ही पाहू शकता.
पहिला पर्याय म्हणजे सोन्याची नाजुक नथ. सणावाराला घालायला नाजुक नथ हवीच..
रोजच्या वापरासाठी सोन्याचे छोटेसे कानातलेही तुम्ही घेऊ शकता. एक ते दिड ग्रॅममध्ये चांगले कानातले मिळतील.
चांदीच्या जोडव्यांचा विचारही करा. जोडव्यांचे कित्येक नवनविन प्रकार सध्या बाजारात आलेले आहेत.
रोजच्या वापरासाठी नाजुक अंगठी घ्यायची असेल तर दसऱ्याचा मुहूर्त उत्तम आहे. या दिवसांत अंगठ्यांमध्ये खूप नवनविन प्रकार पाहायला मिळतात.
३ ते ४ ग्रॅम वजनात तुम्ही छानशी ठुशीही घेऊ शकता.
मोत्याचे मणी आणि सोन्याचे पेंडंट असलेल तन्मणीही यानिमित्ताने खरेदी करता येऊ शकतो. २ ते ३ ग्रॅम वजनात तन्मणीचे चांगले पेंडंट मिळू शकते.