अस्सल पैठणी घेणं परवडत नाही? स्वस्तात घ्या सुंदर कॉटन पैठणी- एकापेक्षा एक आकर्षक रंग
Updated:October 11, 2025 18:01 IST2025-10-11T17:37:13+5:302025-10-11T18:01:34+5:30

दिवाळीच्या निमित्ताने बऱ्याचजणी महागड्या साड्यांची खरेदी करतात. पण आता सिल्कच्या साड्यांचे भावही खूप वाढले आहेत. त्यातही जर तुम्हाला अस्सल पैठणी घ्यायची असेल तर तिच्यासाठी कमीतकमी १० हजारांचं बजेट ठेवावं लागतं.
१० हजारांची पैठणी घेणं सगळ्यांनाच परवडणारं नाही. शिवाय काही जणी अशाही असतात की त्यांना एवढा मोठा पैसा साडीमध्ये अडकवायला नको वाटतो. म्हणूनच एकदम १० हजार साडीवर खर्च करण्यापेक्षा २ ते ३ हजारांत बाजारात सुंदर कॉटन पैठणीही मिळतात.
अशा आकर्षक रंगांमध्ये कॉटन पैठणी मिळत असून त्यांचा पदरही खूपच आकर्षक असतो.
कॉटन पैठणींची एक खासियत म्हणजे या पैठणीही हातमागावर तयार केलेल्या असतात. शिवाय त्या अतिशय तलम आणि मऊ असतात. त्यांचं वजनही कमी असतं. त्यामुळे ज्यांना जास्त जड साड्या नेसाव्या वाटत नाहीत, त्यांच्यासाठी कॉटन पैठणी हा एक चांगला प्रकार आहे.
कॉटन पैठणीमध्ये असे अनेक आकर्षक रंग मिळत असून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही त्या मागवू शकता.
कमी किंमत, आकर्षक रंग आणि देखणा पदर यामुळे कॉटन पैठणी हा प्रकार सध्या महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय होत आहे.
लवकरच येणारी दिवाळी आणि पुढे येणाऱ्या लग्नसराईच्या निमित्तानेही कॉटन पैठणीला सध्या खूप मागणी आहे.