दंड खूपच जाड आहेत? 'या' १० पॅटर्नचे ब्लाऊज शिवा; कोणतीही साडी नेसली तरी दिसाल बारीक दिसाल
Updated:October 25, 2024 14:36 IST2024-10-24T19:48:56+5:302024-10-25T14:36:45+5:30
Blouse Designs For Fat Arms : डार्क रंगात तुमचे हात उठून दिसतील. जर तुम्ही लाईट रंग निवडले तर फॅट जास्त दिसून येऊ शकतं.

सण-उत्सवांच्या काळात साडी नेसायला प्रत्येकालाच आवडते. (Styling Tips) काहीजण तब्येत सुटल्यामुळे साडी नेसणं टाळतात. साडीत दंड जाड दिसतील, साडीमध्ये आपण खूप लठ्ठ वाटू म्हणून बऱ्याचजणी साडी नेसणं टाळतात. (Blouse Design For Ladies To Look Slim)
साडी नेसून सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊजचे काही नवीन पॅटर्न्स ट्राय करू शकता. या पॅटर्नचे ब्लाऊज घातल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि साडीही शोभून दिसेल. (Blouse Designs For Fat Arms)
या ब्लाऊज पॅटर्न्समध्ये तुम्ही बारीक दिसाल याशिवाय तुमचे वजनही जास्त दिसून येणार नाही. साडी नेसल्यावरही आर्म फॅट दिसून येणार नाही.
जर हात गुबगुबीत असतील तर एल्बो लेंथ ब्लाऊज, बोट नेक किंवा थ्री-क्वाटर स्लिव्हज तुमचे फॅट लपवण्यासाठी उत्तम आहेत.
ब्लाऊजचे योग्य कापड आणि स्टायलिंग टिप्स टिप्स लक्षात घेऊन तुम्ही कोणतीही काळजी न करता ब्लाऊज शिवू शकता.
जाड काठापदराच्या साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही लाईटवेट फॅब्रिक्स जसं की शिफॉन, जॉर्जेट या कापडाच्या साडया निवडून ब्लाऊज शिवले तर स्लिमिंग इफेक्ट मिळेल.
डार्क रंगात तुमचे हात उठून दिसतील. जर तुम्ही लाईट रंग निवडले तर फॅट जास्त दिसून येऊ शकतं.
जर तुमची ब्रेस्ट साईज जास्त असेल तर व्ही नेक ब्लाऊज शोभून दिसेल.
काळ्या,लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही अधिक स्लिम दिसाल.
अभिनेत्रींच्या ब्लाऊज डिजाईन्सप्रमाणे तुम्ही सुंदर ब्लाऊज आणि साड्यांची निवड करू शकता.