लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम सोन्याचे झुमके, कमी बजेटमध्ये एकापेक्षा एक भारी डिझाइन्स - पाहा सुंदर पॅटर्न...
Updated:November 27, 2025 17:00 IST2025-11-27T16:56:04+5:302025-11-27T17:00:10+5:30
1 gram gold earrings : gold earrings for girls: budget gold jewellery: या झुमक्याचे काही डिझाइन्स आपण ट्राय करु शकतो. पाहूयात सुंदर लेटेस्ट पॅटर्न

लग्न समारंभ म्हटलं की आपल्याला सुंदर, छान दिसायचे असते. त्यासाठी आपण सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करतो. पण अनेकदा आपल्याला हवी तशी ज्वेलरी काही सापडत नाही. मग आपला हिरमोड होतो. सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. अशातच जर आपल्या मुलीचे लग्न असेल तर दागिने घेताना आपल्या नाकीनऊ येते. पण पर्याय म्हणून आपण १ ग्रॅम सोन्याचे झुमके खरेदी करु शकतो. (1 gram gold earrings)
मुलीला फार जड झुमके नको हवे असतील पण आकर्षित दिसायचे असेल तर या झुमक्याचे काही डिझाइन्स ट्राय करु शकतो. पाहूयात सुंदर लेटेस्ट पॅटर्न (gold earrings for girls)
सोनेरी लाल बुंद असणारे पारंपरिक कानातले भेट देऊ शकता. या पद्धतीचे कानातले सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे.
मोराच्या आकाराचे आणि त्यावर झुमका असे कानातले आपण खरेदी करु शकतो. यावर लाल आणि हिरव्या रंगाचे खडे सुद्धा असतात.
आपण कुंदन पोल्की वर्क असलेले हे सुंदर सोन्याचे पारंपारिक झुमका डिझाइन पाहू शकता. हे कानातले बहुतेक महिलांना आवडतात.
फुलांचे मोर असलेल्या डिझाइनचे झुमका कानातले बनवू शकता. कोणत्याही पारंपारिक पोशाखासोबत उठून दिसतील.
मुलीचे लग्न होणार असेल किंवा तिचा पहिला वाढदिवस असेल, तर तिला कोणत्याही खास प्रसंगी सोन्याच्या घंटेच्या आकाराचा हा सुंदर झुमका डिझाईन भेट देऊ शकता.