Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अधिक मास २०२६ : जावयासोबत लेकीलाही द्या खास भेट, ९ वस्तू - पुढच्या अधिकापर्यंत रोज उपयोगाची माहेरची भेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 19:05 IST

1 / 12
अधिकमास ज्याला आपण धोंड्याचा महिना असं देखील म्हणतो. या अधिकमासात विशेष करुन जावयाचे कोडकौतुक आणि भरपूर लाड केले जातात. जावयाचे कोडकौतुक, मानपान आणि भरपूर लाड करण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण याचसोबत आपल्या लेकीचेही लाड करणे ही प्रत्येक आई-वडिलांसाठी तितकीच आनंदाची गोष्ट असते. लग्नानंतर माहेरी आलेल्या लेकीला प्रेमाने काही खास भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते.
2 / 12
लग्नानंतर सासरी गेलेली लेक जेव्हा अधिकमासाच्या निमित्ताने माहेरी येते, तेव्हा जावयासोबतच तिचेही कौतुक होणे तितकेच गरजेचे असते. जावयाला मानपान देताना, आपल्या लेकीलाही काहीतरी खास आणि तिच्या आठवणीत राहील अशी भेटवस्तू देऊन तिचे लाड पुरवणे, हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्यच!
3 / 12
पण, 'जावयाला तर वाण दिले, आता लेकीला असं काय वेगळं आणि खास द्यायचं जे तिच्या उपयोगालाही येईल असा प्रश्न कित्येकदा आपल्याला पडतोच. 'या अधिकमासात, जावयासोबतच लाडक्या लेकीला देण्यासाठी काही अतिशय सुंदर, ट्रेंडी आणि बजेटमधील भेटवस्तूंचे खास पर्याय'! तिच्या रोजच्या आवडीनिवडीपासून ते कायम आठवणीत राहतील अशा कोणत्या वस्तू तुम्ही तिला देऊ शकता, हे पाहूयात.
4 / 12
आजकाल बाजारात एकापेक्षा एक ट्रेंडी, अँटीक आणि नाजूक डिझाईन्सची चांदीची जोडवी मिळतात. अधिकमासाच्या निमित्ताने लेकीला चांदीची जोडवी भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ती ती रोज वापरूही शकते.
5 / 12
सध्या लाईटवेट घुंगरू नसलेले किंवा साधे नक्षीदार पैंजण खूप फॅशनमध्ये आहेत, जे लेकीला नक्कीच आवडतील आणि रोजच्या वापरासाठी सहज वापरताही येतील.
6 / 12
सण-समारंभ असो किंवा माहेरचा मान, साडी किंवा ड्रेस हा महिलांसाठी सर्वात सदाबहार आणि बेस्ट पर्याय आहे. लेकीच्या आवडीनुसार एखादी सुंदर पैठणी, पारंपरिक काठपदराची साडी किंवा सध्या ट्रेन्डिंग असलेला एखादा डिझायनर ड्रेस तुम्ही तिला देऊन तिची हौस पुरवू शकता.
7 / 12
आजकालची लेक नोकरी करणारी असो किंवा गृहिणी, बाहेर जाताना एक चांगली पर्स किंवा क्लच तिच्याकडे असणे गरजेचे असते. तिच्या ऑफिस युजसाठी किंवा सणासुदीला वापरण्यासाठी एखादी स्टायलिश, चांगल्या ब्रँडची हँडबॅग किंवा पारंपरिक पोटली बॅग तुम्ही तिला गिफ्ट करू शकता.
8 / 12
हल्ली सणासमारंभाला दरवेळी सोन्याचे दागिने घालणे शक्य होत नाही. अशावेळी बाजारात मिळणारे सुंदर कुंदन सेट, चोकर, टेम्पल ज्वेलरी किंवा अँटीक झुमके यांसारखे इमिटेशन ज्वेलरीचे पर्याय खूप बजेट-फ्रेंडली आणि आकर्षक ठरतात. हे तिच्या वेगवेगळ्या कपड्यांवर मॅच होतील.
9 / 12
प्रत्येक स्त्रीला स्वतःला सुंदर दिसायला आवडते. लेकीची आवड ओळखून तुम्ही तिला एखाद्या चांगल्या ब्रँडचे स्किन केअर किट (जसे की मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन) किंवा मेकअपचे प्रॉडक्ट्स भेट देऊ शकता. हे गिफ्ट तिच्या रोजच्या वापरात येईल आणि तिला नक्कीच स्पेशल फील करून देईल.
10 / 12
घड्याळ हे केवळ वेळ दाखवत नाही तर ते एक उत्तम स्टाईल स्टेटमेंट आहे. लेकीला साडी आणि वेस्टर्न दोन्ही कपड्यांवर उठून दिसेल असं एखादं नाजूक रोज गोल्ड रंगाचं घड्याळ किंवा आजकालच्या ट्रेन्डनुसार एखादं उपयुक्त 'स्मार्ट वॉच' तुम्ही देऊ शकता.
11 / 12
स्वयंपाकघरात तिची धावपळ कमी व्हावी म्हणून तुम्ही तिला एखादं स्मार्ट गॅजेट गिफ्ट करू शकता. जसे की - 'एअर फ्रायर', 'हँड ब्लेंडर' किंवा एखादा 'मल्टी-कुकर'. यामुळे तिचा वेळही वाचेल आणि तिचं आरोग्यही चांगलं राहील.
12 / 12
लेकीच्या लहानपणापासूनच्या आठवणी किंवा तिच्या लग्नातील आई-वडिलांसोबतच्या गोड क्षणांचे फोटो एकत्रित करून बनवलेली एक सुंदर 'कॅनव्हास फोटो फ्रेम' किंवा 'एलईडी लॅम्प' तुम्ही भेट देऊ शकता.
टॅग्स : खरेदीअधिक महिनागिफ्ट आयडिया