1 / 10अधिक मासात जावयाला अनारसे, बत्तासे असे वाण दिले जाते. त्या वाणाच्या ताटामध्ये एक निरांजन देखील असते. ती निरांजन लावायची आणि मग जावयाला वाण द्यायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे सध्या महिलांमध्ये निरांजन खरेदी वाढली आहे.2 / 10अशी तांब्याची निरांजन लावून वात दिले जाते. दिप दान करण्याला या महिन्यात महत्त्व आहे. पण आता काळानुसार त्यात थोडा बदल झाला असून तांब्याच्या पारंपरिक धाटणीच्या निरांजनीऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या, नव्या पद्धतीच्या निरांजन किंवा दिवे दिले जात आहेत.3 / 10त्यामुळे सध्या बाजारात असे कित्येक आकर्षक पद्धतीचे दिवे आलेले आहेत.4 / 10चांदीची निरांजन जावयाला द्यायची असेल तर त्यात असे सुंदर डिझाईन्स मिळत आहेत. हा दिवा शो पीस म्हणूनही नंतर घरात ठेवता येऊ शकेल असाच आहे.5 / 10चांदीच्या निरांजनीमध्ये कमी वजनाची पण सुंदर डिझाईन असणारी निरांजन किंवा दिवा हवा असेल तर असे कित्येक पर्याय उपलब्ध आहेत.6 / 10पितळाच्या निरांजनीचेही कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध असून अगदी ७०- ८० रुपयांपासून त्या मिळत आहेत.7 / 10हा एक अतिशय सुंदर दिवा पाहा.. सजावटीसाठीही तो खूप छान आहे. 8 / 10सोलार निरांजन किंवा दिवा हा एक प्रकार सध्या खूप ट्रेंडिंग आहे. हा दिवा रांगोळीमध्ये, दिवाळीमध्ये सजावटीसाठी कुठेही सहज ठेवता येत असल्याने याची मागणीही वाढते आहे.9 / 10बजेट कमी असेल तर अशा पद्धतीची स्टीलची निरांजनही देऊ शकता.10 / 10व्हाईट मेटल किंवा ॲल्युमिनियमच्या निरांजनी किंवा दिवे दिसायला सुंदर असतात आणि त्यांची किंमतही कमी असते. त्यामुळे त्यांच्यातले असे डिझाईन्स किंवा इतरही वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहू शकता.