गौराईला घाला पारंपरिक दागिन्यांचा साज- ५ ठसठशीत देखणे दागिने घरच्या गौरींसाठी घ्यायलाच हवे
Updated:August 21, 2025 10:00 IST2025-08-21T09:51:51+5:302025-08-21T10:00:02+5:30

गौरींसाठी किंवा महालक्ष्मींसाठी साड्यांची निवड जशी आपण चोखंदळपणे करतो, तशीच निवड त्यांच्या दागिन्यांच्या बाबतीतही व्हायला हवी. दागिने आणि साडी हे कॉम्बिनेशन परफेक्ट जुळून आलं की मग गौरी उठून दिसतात.
म्हणूनच गौरींसाठी ठसठशीत आणि भरीव दिसतील असे दागिने घ्यायला हवे. त्यात तुम्ही ३ ते ४ पदरी एकदाणी किंवा ढोलक मण्यांची माळही घेऊ शकता.(5 traditional jewellery for gauri or mahalaxmi)
दोन ते तीन पदरी मोहन माळीचा सेटही गौरींच्या अंगावर छान दिसतो. गौरींसाठी नेहमी ठसठशीत दागिने घ्यावे. नाजुक दागिने फारसे उठून दिसत नाहीत.
अशी जाडसर वज्रटीक किंवा ठुशी गौरींच्या अगदी गळ्यालगत घाला आणि त्यानंतर एकेक दागिना घाला. गळाभरून दागिने दिसतील.
गळ्यालगत ठुशी किंवा वज्रटीक आणि त्याच्या खालोखाल एखादी मोठी माळ असं घालणार असाल तर त्या दोन्हींच्या मध्ये मोत्याचा लांब तन्मणी घाला. सोनेरी दागिन्यांमध्ये मोती उठून दिसतात.
गौरींसाठी अशा पद्धतीचा लक्ष्मीहारही नक्की घ्या. यामुळे गौराईचं रूप आणखी खुलून येतं.