Join us

लग्नाचा सिझन झाला सुरु, फंक्शनमध्ये दिसायचं उठून? मग एकदा अनुपमाच्या ६ क्लासी-ट्रेण्डी ब्लाउज डिझाईन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2024 18:17 IST

1 / 7
घराघरात महिलांच्या मनात स्थान निर्माण करणारी अनुपमा अर्थात अभिनेत्री रुपाली गांगुली सर्वाना ठाऊक आहे. तिने साकारलेली अनुपमा हे पात्र सर्वांनाच भावलं. तिची या सीरिअलद्वारे लोकप्रियता प्रचंड वाढली. मुख्य म्हणजे मराठी टेलिव्हिजन जगतातली सीरिअल 'आई कुठे काय करते' याच विषयावर आधारित आहे. अनुपमा या सीरिअलमध्ये रुपालीचे एक से एक ब्लाउज आणि साडी डिझाईन पाहायला मिळतात. तिचे साडी कलेक्शन आणि ब्लाउजची चर्चा महिलावर्गात प्रचंड प्रमाणात होते. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. फंक्शनमध्ये आपल्याला ट्रेण्डी आणि सुंदर दिसायचं असेल तर, एकदा अनुपमाच्या साडी डिझाईन आणि ब्लाउजवर नजर टाका(5 Blouse Simple styles inspired by Rupali Ganguly for ethnic beautiful sarees).
2 / 7
प्रेक्षकवर्गाला अभिनयातून मोहित करणारी रुपाली आपल्या स्टाईलिश साड्या आणि ब्लाउज डिझाईनसाठी ओळखली जाते. जर आपण एथनिक लूक कॅरी करणार असाल तर, त्यावर हाल्फ स्लीव्हज ब्लाउज शोभून दिसेल. त्याच्या बाह्यांवर डिझाईन उठून दिसतील.
3 / 7
जर आपली नेटची असेल तर, फुल स्लीव्हज सिक्विन ब्लाउज ट्राय करा. सध्या सिक्विन साडी आणि ब्लाउजचा ट्रेण्ड सुरु आहे. हेवी वर्कच्या साड्यांवर फुल स्लीव्हज शोभून दिसतील.
4 / 7
काही वेळेस साडी सिंपल असते. पण त्यावर साधं ब्लाउज घालण्याची चूक करू नका. जर आपली साडी सिंपल असेल तर, फ्रील डिझाईनसह डीपनेक ब्लाउज ट्राय करा. डीप नेक ब्लाउज विथ फ्रील स्लीव्हज घातल्याने आपल्याला एक क्लासी लूक मिळेल.
5 / 7
रुपाली गांगुलीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने लाल रंगाच्या साडीवर ओव्हल शेप बॅक ब्लाउज परिधान केला होता. यात ती सुंदर तर दिसत होती, शिवाय हा ब्लाउज पॅटर्न प्रत्येक साडी लूकवर शोभून दिसेल.
6 / 7
पूर्वीच्या काळात अभिनेत्री पफ स्लीव्हजच्या ब्लाउज घालत असत. सध्या तो ट्रेण्ड पुन्हा आला आहे. पफ स्लीव्हजमुळे साडीला एक वेगळाच लूक मिळतो. जर आपले दंड जाड असतील तर, पफ स्लीव्हज आणखीन उठून दिसतील.
7 / 7
टॅग्स : फॅशनखरेदी