माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

Updated:March 4, 2025 19:28 IST2025-03-04T15:25:27+5:302025-03-04T19:28:57+5:30

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

माठाची खरेदी करायला जाणार असाल तर या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. कारण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की नवा माठ तर घरी आणला जातो. पण त्यात पाणी गार होत नाही. किंवा मग तो खूप जास्त पाझरतो आहे, गळतो आहे असं लक्षात येतं. म्हणूनच माठाची खरेदी परफेक्ट होण्यासाठी काही गोष्टी तपासून घेतल्याच पाहिजेत.(4 important tips for matka or math shopping in summer)

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

माठ खरेदी करण्यासाठी नेहमी उजेडात, मोकळ्या सुर्यप्रकाशात जा. त्यामुळे त्याच्यात जर काही दोष असेल तर तो बारकाईने पाहिल्यास स्पष्ट दिसू शकतो. जो माठ घ्यायचा आहे तो वर करा आणि उलटा करून त्याच्या आत पाहा.. त्याला जर एखादं छिद्र असेल तर ते लगेच दिसून येईल.

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

जो माठ घेणार आहात तो नेहमी हाताने थाप देऊन वाजवून पाहावा. थपथप आवाज आलेला आणि ज्याचा आवाज थोडा मजबूत, भरल्यासारखा येईल तोच माठ घ्यावा. ज्या माठाचा आवाज बारीक, हलका येतो तो माठ गळका असू शकतो.

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

माठाला जर तोटी असेल तर ती व्यवस्थित बसवली गेली आहे का, तिच्या आजुबाजुला एखादे छिद्र तर नाही ना, हे सुद्धा एकदा तपासून घ्या..

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार

माठ नेहमी लाल किंवा काळ्या मातीचाच असावा. पांढऱ्या रंगाचे नक्षीदार माठ घेणं टाळावं.