सुंदर साजिरा श्रावण आला! सणासुदीला गळ्यात शोभेल ठसठशीत मंगळसूत्र, बघा १० सुंदर ॲण्टिक डिझाइन्स
Updated:July 11, 2025 18:10 IST2025-07-11T17:18:50+5:302025-07-11T18:10:44+5:30

श्रावणात सणवार, व्रतवैकल्ये भरपूर असतात. म्हणूनच एरवी गळ्यात नाजुक मंगळसूत्र असलं तरी अशावेळी मात्र एखादं ठसठशीत मंगळसूत्र हवंच.. श्रावणाच्या निमित्ताने ॲण्टिक मंगळसूत्र घ्यायचं असेल तर हे बघा काही खास डिझाईन्स..
अनेक जणींना ठसठशीत वाट्या असणारे मंगळसूत्र सणवाराला घालायला आवडतात. त्यांना हे वाट्यांचं डिझाईन आवडू शकतं.
हे एक असंच गळ्यात भारदस्त दिसणारं मंगळसूत्र पाहा. असं एखादं मंगळसूत्र गळ्यात असेल तर इतर कोणत्याच दागिन्याची गरज वाटत नाही.
या मंगळसूत्राचं पेंडंट अतिशय आकर्षक, वेगळं आणि बघताक्षणीच आवडणारं आहे.
काही जणींना स्टोनचे पेंडंट आवडतात. ते थोडे ट्रेण्डी लूकही देतात. अशा स्टोनच्या पेंडंटचे कित्येक नवनविन प्रकार तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकतात.
काळे मणी आणि सोनेरी मणी एकमेकांत गुंफण्याची पद्धत खूपच वेगळी असल्याने हे मंगळसूत्राचं डिझाईन खूप वेगळं झालं आहे.
मंगळसूत्राचा आकर्षकपणा त्याच्या पेंडंटवर खूप अवलंबून असतो. हे बघा त्याचंच एक छान उदाहरण.
अशा वेगळ्या प्रकारचं पेंडंट असणारं मंगळसूत्र घेतलं तर ते काठपदर तसेच डिझायनर साड्यांवरही छान दिसतं.
अशा पद्धतीच्या मंगळसूत्राला ठुशी मंगळसूत्र म्हणतात. कारण त्याचे मणी ठुशीमधल्या मण्यांप्रमाणे गुंफलेले असतात. सध्या या मंगळसूत्राचीही फॅशन आहे.
मोराचं डिझाईन असणारे मंगळसूत्रही अनेक महिला हौशीने घेतात. त्याच प्रकारातलं हे एक छानसं आणि गळ्यात अगदी उठून दिसणारं डिझाईन पाहा.