१ ग्रॅम सोन्यात घ्या मंगळसुत्र ब्रेसलेट, ८ नवीन डिजाईन्स; हातावर शोभून दिसतील ट्रेंडींग पॅटर्न्स
Updated:December 15, 2024 11:53 IST2024-12-14T18:57:28+5:302024-12-15T11:53:51+5:30
1 gram gold Mangalsutra bracelet : एक ते दोन ग्रॅम सोन्यात बनवून मिळतील अशा काही ब्रेसलेट्सच्या डिजाईन्स पाहूया.

मंगळसुत्राप्रमाणे काळेमणी असलेल्या ब्रेसलेटच्या क्रेझ अनेक वर्षांपासून महिलांमध्ये आहे. अनेक विवाहीत स्त्रिया हातात काळ्या मण्याचं सुंदर ब्रेसलेट घालणं पंसत करतात. (8 New Designs Gold Mangalsutra bracelet Designs)
एक ते दोन ग्रॅम सोन्यात बनवून मिळतील अशा काही ब्रेसलेट्सच्या डिजाईन्स पाहूया. या डिजाईन्स पाहून तुम्हालाही ब्रेसलेट घेण्याचा मोह आवरणार नाही.
फक्त सोन्यातच नाही तर चांदीमध्येसुद्धा तुम्ही ब्रेसलेट बनवून घेऊ शकता. सोन्यात किंवा चांदीमध्ये तुम्हाला खास ब्रेसलेट्स उपलब्ध होतील.
मंगळसुत्रात एक सिंगल मणी असलेलं किंवा स्टोन असलेले पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
मंगळसुत्र ब्रेसलेटच्या सेंटरला एक छोटं फुलंसुद्धा छान वाटतं.
इन्फिनिटी आणि हार्ट शेपचं साईनसुद्धा छान दिसतं.
मंगळसुत्रात ३ गोल गोल रिंग्ससुद्धा छान वाटतील.
तुम्हाला फार काळे मणी आवडत नसतील तर गोल्डन मणी जास्त असलेले ब्रेसलेट निवडू शकता.