लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

Updated:October 9, 2025 18:40 IST2025-10-09T16:46:36+5:302025-10-09T18:40:25+5:30

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल की लग्नानंतर २०- २५ वर्षे झाली की जोडपी आपोआप एकसारखी दिसू लागतात.. काही जणांकडे पाहून तर आपल्याला हे अगदी खरं आहे असंही जाणवतं...

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

यामागे नेमकं काय कारण असतं याविषयीची माहिती तज्ज्ञांनी dr.dhrutianklesari या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की लग्नानंतर बरंच आयुष्य एकमेकांसोबत घालविल्यानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये हा बदल दिसतो. त्यालाच इमोशनल ऑस्मोसिस असं म्हणतात.

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

त्या म्हणतात की बरीच वर्षे एकत्र राहून ते एकमेकांची सुखदु:ख शेअर करत असतात. सोबत हसतात, सोबत रडतात.. या सगळ्या सारख्याच भावना एकमेकांसोबत शेअर करताना त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स आणि मायक्रो एक्सप्रेशन्सही सारखे होत जातात. त्यालाच सायकोलॉजीमध्ये लव्ह इन रिफ्लेक्शन म्हणतात.

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

भरपूर वर्षे सोबत राहिल्याने एकमेकांचे बॉडी पोश्चर, एखाद्या प्रसंगावर रिॲक्ट करण्याची त्यांची पद्धत यातही साम्य येतं. काही काही गोष्टी सुरुवातीला जुळत नसल्या तरी कालांतराने आवडीनिवडी सारख्या होत जातात. यालाच लव्ह इन ॲक्शन म्हणतात.

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

आणि तिसरी गोष्ट म्हणजे हळूहळू त्यांची लाईफस्टाईलही अगदी सारखी होऊन जाते. सकाळी उठण्याच्या वेळा, कामाच्या सवयी, जेवणाच्या वेळा, जेवणातले पदार्थ, झोपण्याच्या वेळा असं सगळंच अगदी सारखं होऊन जातं. एकमेकांवर प्रेम करत त्यांनी अख्खं आयुष्यच एकमेकांशी शेअर केलेलं असतं.

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायको एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....

याचा परिणाम हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो आणि मग त्यांच्या दिसण्यातही आपल्या साधर्म्य जाणवू लागतं.