प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

Published:June 30, 2024 02:12 PM2024-06-30T14:12:07+5:302024-06-30T15:35:07+5:30

How Did Virat and Anushka Redefine Couple Goals Through Prioritising Each Other's Mental Health and Success : आपल्या नात्यासाठी स्वतःपलीकडे विचार करणारे, एकमेकांसाठी जगणारे वैवाहिक नाते

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

ट्वेंटी-२० चा अखेरचा सामना हा अविस्मरणीय ठरला (Virat Kohli). भारताने ७ धावांनी सामना जिंकला आणि इतिहास रचला. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचं वर्षाव होत आहे (Anushka Sharma). यातच टीम इंडियाच्या कुटुंबीयांनी देखील जल्लोष साजरा केला. सामना जिंकल्यानंतर विराटने आपल्या बायकोला व्हिडिओ कॉल लावला होता (Couple Goals). पती-पत्नीचे हे प्रेम पाहून नेटकरीही भावूक झालेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, आणि हे त्यांच्यातील बॉण्डिंगवरून दिसते(How Did Virat and Anushka Redefine Couple Goals Through Prioritising Each Other's Mental Health and Success).

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

कितीही संकटे आली किंवा सुखाचे काही प्रसंग. प्रत्येक वेळीस आपला पार्टनर आपल्यासोबत उभा असतो. जोडीदाराची साथ ही लाखमोलाची असते. यश असो किंवा पराभव अनुष्का नेहमी विराटच्या मागे खंबीरपणे उभी राहिली असल्याचं दिसून आलं आहे. विराटने व्हिडिओ कॉल दरम्यान, अनुष्काला फ्लाईंग किसही दिला. शिवाय लेक वामिकीशीही गप्पा मारल्या. व्हिडिओ कॉलदरम्यान विराटचे डोळे पाणावले होते.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

इंडियाने सामना जिंकल्यानंतर अनुष्काच्या पोस्टकडे सर्वांच्या नजरा होत्या. तिने सामना जिंकल्यानंतरचे संघाचे भावूक करणारे काही फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करीत लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

'आमच्या लेकीने सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी सर्व खेळाडूंना मिठी मारण्यासाठी कोणी असेल का? असा प्रश्न तिने विचारला. यावर उत्तर देताना मी म्हणाले, 'हो डार्लिंग… कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. किती अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स - अभिनंदन!'.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

२०२४ हे वर्ष विराट आणि अनुष्कासाठी फारच खास ठरलं. यावर्षी दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याने एन्ट्री केली. यातच ट्वेंटी-२० चा अखेरचा सामना जिंकणे ही देखील दोघांसाठी मोठी बाब आहे. पण यानंतर त्याने निवृत्त होण्याची घोषणा केली.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

फायनल जिंकल्यानंतर, ‘हा माझा शेवटचा टी-२० विश्वचषक होता, पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर करणार होतो. पुढच्या पीढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला. कारण रोहितला नऊ वर्ल्ड कप वाट पाहावी लागली, माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे या वर्ल्डकपसाठी खऱ्या अर्थाने पात्र होता'. असं विराट कोहली म्हणाला.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

विराट आणि अनुष्काचं बॉण्डिंग हे अत्यंत खास आहे. विराटने स्वत: एका मुलाखतीत अनुष्का आपली सपोर्ट सिस्टम असल्याचं कबुल केलं. ज्यावेळी अनुष्का आणि विराट लग्नबंधनात अडकले, तेव्हा अनुष्का करिअर व फेमच्या मोठ्या टप्प्यावर उभी होती. अशा टप्प्यावर कोणीही लग्न करण्याचा विचार करणार नाही. पण अनुष्काने या बंधनात अडकण्याचचं ठरवलं. तिने लवकर लग्न करणं हा आपल्या आयुष्यातील एकदम योग्य निर्णय असल्याचं सांगितलं.

प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..

अनुष्काचं कौतुक करीत विराटने एका मुलाखतीत सांगितले की, 'मॅचमध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आमच्या प्रेमाच्या आड येत होती, पण अनुष्काने समजूतदारपणा दाखवत आयुष्यात येणा-या उतार-चढावांची मला जाणीव करुन दिली.' त्यामुळे नात्यात दोघांचा समजूतदारपणा किती गरजेचं आहे, नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांना समजून घेणं किती गरजेचं आहे, हे त्याने सांगितलं.