Join us   

५ गोष्टींबद्दल जोडीदाराशी कधीच खोटं बोलू नका , नातं तुटायला वेळ नाही लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 7:24 PM

1 / 9
नात्यात विश्वास असणं फार महत्वाचं आहे. विश्वास आणि प्रेम जर असलं तर कोणतेही नातं तुटणार नाही. जर आपल्याला देखील दीर्घकाळ, चांगले आणि मजबूत नाते बनवायचे असेल तर चुकूनही आपल्या पार्टनरसह खोटं बोलू नका. खोटे बोलल्याने आपल्या नात्यातील विश्वास कमी होत जातो. त्यामुळे नाते लवकर तुटण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.
2 / 9
मजबूत आणि प्रेमळ नात्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. रिलेशनशिप खूप नाजूक असते. खोटं अथवा चुकीच्या माहितीमुळे नातं तुटायला वेळ नाही लागणार. एकमेकांवर असलेला विश्वास नात्यात गोडी आणतो.
3 / 9
नातं जोडणं खूप सोप्पं असतं. मात्र, ते नातं टिकवणं तितकच अवघड असतं. नातं टिकवताना आपल्या पार्टनरपासून कोणती गोष्ट लपवू नका. जर ती गोष्ट तुमच्या नकळत त्यांना कळली तर त्यांना सहाजिकच वाईट वाटेल. याने तुमच्यामधील असलेला विश्वासाचे नाते तुटू शकते.
4 / 9
कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी दोन व्यक्तींना थोडा समज आणि परस्पर समन्वय राखण्याचा सल्ला दिला जातो. नात्यात मजबूती टिकवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला चुकूनही असे खोटे बोलू नका, ज्यामुळे तुमच्या नात्यात तेढ निर्माण होईल.
5 / 9
तुमच्या एक्स पार्टनरच्या संपर्कात राहायचे की नाही हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे. मात्र, सध्याच्या पार्टनरपासून त्यांच्यासंबंधित खोटे लपवून ठेऊ नका. जर एखाद्या दिवशी तुमच्या जोडीदाराला सत्य कळले तर ती गोष्ट तुमच्या नात्यात दुरावा आणू शकते.
6 / 9
तुमच्या जोडीदाराशी भांडण करताना तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवता आणि त्यांच्याकडून विचारल्यावर 'मी ठीक आहे' असे बोलूनच खोटे बोलता का? हे करणे चुकीचे आहे. मनात भावना दाबण्यापेक्षा प्रत्येक्षात केव्हाही बोलून मोकळे होणे, योग्य ठरेल. या कारणामुळे तुमचे नाते कमकुवत होऊ शकते.
7 / 9
तुमच्या पगाराबद्दल तुमच्या पार्टनरशी कधीही खोटे बोलू नका. तुम्ही लपवण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी हे सत्य आज ना उद्या त्यांच्यासमोर येईल. कारण खोटा पगार अथवा तुम्ही आयुष्यात कुठल्यातरी मोठ्या स्थानावर आहात असे त्यांना भासवणं चुकीचे आहे. आणि हे सत्य कधी ना कधी समोर येईल.
8 / 9
एकमेकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्याला महत्त्वही द्या. कारण यातच तुम्ही आपल्या पार्टनरला किती महत्व देत आहे हे कळून येते. तसेच, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांचे लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला काही समजत नसेल तर त्यांनाच विचारा. यामुळे भांडणे होण्याची शक्यता कमी होते.
9 / 9
ईर्ष्याला नात्यांमध्ये स्थान नसते. जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा हेवा वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या दोघांमधील नाते मजबूत नाही किंवा भविष्यात ते कमकुवत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या यशात सामील व्हा. आणि आनंदी रहा.
टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिप