नवऱ्यावर प्रेम म्हणून तुम्हीही ‘या’ ५ गोष्टी करता का? कायम दु:खी राहाल आणि नातंही होईल कमजोर
Updated:March 17, 2026 20:00 IST2026-03-17T20:00:00+5:302026-03-17T20:00:02+5:30
Natyat swataha cha sanman kasa rakhava: Relationship tips for women in Marathi: ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं भविष्यात स्त्रियांना महागात पडू शकतं.

"प्रेम म्हणजे त्याग आणि प्रेम म्हणजे समर्पण..." हे वाक्य आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, कुटुंबासाठी आणि जोडीदारासाठी 'जुळवून घेणे' (Adjust) हे एका महान गुणासारखे मानले जाते. आपल्या जोडीदाराला आनंदी पाहणं यात काहीच गैर नाही. पण हा आनंद मिळवण्याच्या नादात जेव्हा एखादी स्त्री स्वत:ची ओळख, स्वत:चे छंद आणि स्वतःचा स्वाभिमान विसरते, तेव्हा ते नातं प्रेम न राहता ओझं बनू लागतं.(5 things women should never do for a man)
अनेकदा नात्यात टिकून राहण्यासाठी किंवा जोडीदाराला खूश करण्यासाठी स्त्रिया अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्या भविष्यात त्यांच्यासाठी मानसिक आणि भावनिक ओझे बनतात. जर वेळीच सावध झाले नाही, तर नात्यात दुरावा निर्माण होतो आणि शेवटी फक्त पश्चात्तापाची वेळ येते. (Relationship tips for women in Marathi)
अनेक स्त्रिया लग्नानंतर किंवा नात्यात आल्यानंतर जोडीदाराच्या सोयीसाठी आपली नोकरी किंवा करिअर सोडून देतात. हे स्वेच्छेने घेतलेलं पाऊल असेल तर ठीक, पण केवळ त्याला खूश करण्यासाठी स्वत:ची प्रगती थांबवत असाल तर भविष्यात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल आणि मानसिक त्रासही होऊ शकतो.
प्रत्येक व्यक्तीची काही तत्वं असतात. जर आपला जोडीदार आपल्या विरोधात जाऊन वागायला लावत असेल आणि भांडण नको म्हणून आपण ते मान्य करत असाल, तर तुम्ही स्वत:च्या भावनांचा बळी देत आहात हे वेळीच समजायला हवं.
"तुझ्या त्या मैत्रिणीशी बोलू नको" किंवा "माहेरच्यांशी जास्त संबंध ठेवू नको" अशा अटी जेव्हा घातल्या जातात, तेव्हा ते नातं 'कंट्रोलिंग' होऊ लागतं. जोडीदाराला खूश करण्याच्या नादात आपण हक्कांच्या माणसांपासून दूर जातो.
आपला छंद जोपासणे, आवडते कपडे घालणं सोडले किंवा आवडीच्या गोष्टी नाही केल्या तर आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. आपण जसे आहोत तसाच आपला स्वीकार करणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे.
चूक नसतानाही फक्त वाद टाळण्यासाठी सतत माफी मागण्याची सवय लावू नका. यामुळे जोडीदारासमोर आपली किंमत कमी होते आणि ते आपल्यावर सतत हक्क गाजवतात.