नवरा-बायकोतली भांडण वाढू नयेत म्हणून करा 'या' ५ गोष्टी, जोडीदार आपोआप चांगलं वागेल
Updated:March 16, 2026 13:27 IST2026-03-15T12:54:35+5:302026-03-16T13:27:38+5:30
5 Thing's Healthy Couple Do When They Fight : जर तुमची चूक असेल तर ती मोठ्या मनानं मान्य करा. एक सॉरी अनेक मोठे वाद एका क्षणात मिटवू शकते.

संसार म्हटलं की कुरबुरी या आल्याच पण या भांडणाचे रुपांतर वादात होऊन नात्यात दुरावा येऊ नये यासाठी समंजसपणा दाखवणं फार गरजेचं असतं. (5 Things Happy Couples Do After A Fight)
कोणतंही नातं परिपूर्ण नसते. त्यामुळे एकमेकांच्या स्वभावातील दोष स्वीकारून वादापेक्षा संवादाला महत्व देणं हाच सुखी संसाराचा पाया आहे. ५ गोष्टी फॉलो केल्यास नवरा-बायकोतील नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. (How To Repair After A Fight)
शांत राहा
भांडण सुरू असताना रागाच्या भरात टोकाचं काहीही बोलण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहणं उत्तम ठरतं. जेणेकरून वाद वाढणार नाहीत. (5 Thing's Healthy Couple Do When They Fight)
एकमेकांचं ऐकून घ्या.
स्वत:ची बाजू मांडण्यापूर्वी जोडीदाराला काय म्हणायचं आहे ते शांतपणे ऐकून घ्या आणि त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
चूक मान्य करा
जर तुमची चूक असेल तर ती मोठ्या मनानं मान्य करा. एक सॉरी अनेक मोठे वाद एका क्षणात मिटवू शकते.
भूतकाळ उकरून काढू नका
सुरू असलेल्या विषयांवरच बोला. जुन्या गोष्टी काढून एकमेकांना टोमणे मारणं टाळा.
संवाद साधा
राग शांत झाल्यावर एकत्र बसून मोकळेपणानं चर्चा करा आणि समस्येवर काय मार्ग काढता येईल याकडे लक्ष द्या.