वाईट जोडीदाराची १० लक्षणं, जर तुमचाही जोडीदार ‘असं’ वागत असेल तर सावध व्हा..
Updated:March 4, 2026 18:46 IST2026-03-04T18:07:29+5:302026-03-04T18:46:50+5:30
10 Red Flags In A Relationship Signs Of a Toxic Partner : नात्याचा पाया विश्वास असतो. जर तुमचा जोडीदार सतत लहान मोठया गोष्टीत खोटं बोलत असेल तर तो विश्वास कधीच निर्माण होऊ शकत नाही.

नात्यात प्रेम आदर असणं खूपच महत्वाचं असतं. पण कधीकधी आपण प्रेमात इतके आंधळे होतो की समोरच्या व्यक्तीचा दोष दिसत नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल शाकं असेल तर १० लक्षणं नक्की तपासा
आदराचा अभाव
जर तुम्हाला तुमचा जोडीदार इतरांसमोर किंवा एकांतात तुमचा अपमान करत असेल. तुमच्या मतांना किंमत देत नसेल तर ते मोठ्या धोक्याचं लक्षण आहे.
अतिशय नियंत्रण ठेवणं
तुम्ही काय कपडे घालावे, कोणाशी बोलावे, तुमचे पैसे कुठे खर्च करावेत हे जर जोडीदार ठरवत असेल तर ते निरोगी नात्याचे लक्षण नाही.
सतत संशय घेणं
विनाकारण तुमच्या चारित्र्यावर संशय घेणं, फोन तपासणं तु्म्ही कुठे आहात याचा सतत जाब विचारणं या गोष्टी मानसिक छळाचा भाग असू शकतात.
भावनिक आधार न देणं
जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा जोडीदार सोबत नसणे किंवा तुमच्या भावनांना नाटक समजून दुर्लक्ष करणं हे वाईट जोडीदाराचे लक्षण आहे.
चुकांची जबाबदारी न घेणं
असा जोडीदार आपली चूक कधीच मान्य करत नाही. उलट प्रत्येक भांडणाचे खापर तुमच्यावर फोडले जाते.
संवाद टाळणं
काहीही समस्या उद्भवल्यास शांतपणे चर्चा करण्याऐवजी ओरडणं आणि कित्येक दिवस अबोला धरणं यामुळे नाते गुदमरते.
शारीरिक किंवा शाब्दिक हिंसा
मारहाण करणं हा गुन्हाच आहे पण सतत शिवीगाळ करणं किंवा धमकावणं हे देखील तितकेच घातक आहे.
तुमच्या प्रगतीचा हेवा वाटणं
एक चांगला जोडीदार तुमच्या यशात आनंदी होतो. जर तुमच्या प्रगतीमुळे पार्टनरला असुरक्षित वाटत असेल तर विचार करण्याची गरज आहे.
खोटेपणा किंवा लपवाछपवी
नात्याचा पाया विश्वास असतो. जर तुमचा जोडीदार सतत लहान मोठया गोष्टीत खोटं बोलत असेल तर तो विश्वास कधीच निर्माण होऊ शकत नाही.
फक्त स्वत:चा विचार करणं
नात्यात घेणे आणि देणे या दोन गोष्टी खूपच महत्वाच्या असतात. जर जोडीदार फक्त स्वत:च्या गरजा, आवडीनिवडी आणि सोयींचा विचार करत असे तर नात्यात केवळ एक साधन म्हणून उरता.