Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

Updated:April 3, 2026 20:00 IST2026-04-03T20:00:00+5:302026-04-03T20:00:02+5:30

How to identify your personality type: Dealing with social exhaustion as an introvert: जाणून घेऊया अशा ५ प्रमुख गोष्टी, ज्या ठरवतात की आपली पर्सनालिटी 'इंट्रोव्हर्ट' आहे की नाही.

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

बोलघेवड्या आणि मिळून-मिसळून राहणाऱ्या व्यक्तींना सहसा अधिक स्मार्ट किंवा यशस्वी समजलं जातं. याउलट जो शांत असतो, ज्याला एकटं राहायला आवडतं, त्याला आपण लाजाळू किंवा घाबरट समजतो. पण खरंच कमी बोलणं किंवा एकटं राहणं ही कमजोरी आहे का? मानशास्त्रात याला इंट्रोवर्ट पर्सनालिटी किंवा अंतर्मुख स्वभाव असं म्हणतात.(How to identify your personality type)

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन असोत किंवा यशस्वी उद्योजक बिल गेट्स, या दिग्गज व्यक्तींनी जगाला दाखवून दिले आहे की, शांत राहूनही जग जिंकता येते. इंट्रोव्हर्ट असणे म्हणजे संवाद साधायला घाबरणे नव्हे, तर आपल्या ऊर्जेचा वापर वेगळ्या पद्धतीने करणे होय.जाणून घेऊया अशा ५ प्रमुख गोष्टी, ज्या ठरवतात की आपली पर्सनालिटी 'इंट्रोव्हर्ट' आहे की नाही. (Dealing with social exhaustion as an introvert)

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

इंट्रोवर्ट व्यक्ती अनेकांशी बोलू शकते, हसून-खेळून राहू शकते पण खूप वेळ गर्दीत राहिल्यावर थकवा जाणवतो. त्यांना माणसात गेल्यानंतर स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी एकांत लागतो.

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

इंट्रोवर्ट व्यक्तींना हवामान, फॅशन किंवा उथळ गप्पांवर संवाद साधायला फारसं आवडत नाही. त्यांना एखाद्या विषयावर सखोल चर्चा करायला मनापासून आवडतं. मित्र-मैत्रिणी मोजके असले तर जवळचे असतात.

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

कमी बोलणाऱ्या व्यक्ती सहसा उत्तम 'लिसनर' असतात. ते बोलण्यापूर्वी विचार करतात. समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतात आणि परिस्थितीचे अचूक निरीक्षण करतात. यामुळेच ते अनेकदा चांगले निर्णय घेऊ शकतात.

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

इंट्रोवर्ट व्यक्तीला स्वत:सोबत वेळ घालवायला खूप आवडते. वाचन करणे, गाणी ऐकणे किंवा फक्त शांत बसून विचार करणे यात त्यांना आनंद मिळतो.

Introvert Personality Signs: कुणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते-एकटं राहायला आवडतं? 'या' ५ गोष्टींमुळे तसं वाटतं, पाहा असं का..

अचानक आलेल्या फोनमुळे अनेकदा इंट्रोवर्ट व्यक्ती अस्वस्थ होतात. त्यांना मेसेज किंवा ईमेलद्वारे संवाद साधणे सोयीचे वाटतं. कारण तिथे त्यांना आपले विचार मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि ते अधिक स्पष्टपणे स्वतःचे म्हणणे मांडू शकतात.