नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

Updated:April 12, 2026 19:00 IST2026-04-12T19:00:00+5:302026-04-12T19:00:02+5:30

How to become everyone's favorite: Building confidence in early 20s: स्वत:मध्ये विशीत असताना असे काही बदल करा की यश नक्कीच तुम्हाला मिळेल. कोणत्या ५ सवयी आपण स्वत:ला लावायला हव्या पाहूया.

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

त्यांच्या मुलाला बघ किती मार्क्स मिळाले, तुला साधं बोलण्याची पद्धत नाही... अशा प्रकारचे टोमणे प्रत्येक मुलाने कधी ना कधी आपल्या आयुष्यात ऐकले असतीलच. विशीच पाऊल ठेवले की नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये नकळत आपली तुलना इतरांशी होऊ लागते. ही ती वेळ असते जिथे मुलांना स्वत:ला सिद्ध करण्याचं दडपण असतं. पण फक्त पैसा किंवा पद मिळवून पॉप्युलर होता येत नाही. (How to become everyone's favorite)

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

खरं यश आणि लोकप्रियता ही आपल्या व्यक्तिमत्त्वात दडलेली आहे. जर आपल्या नातेवाईकांच्या टोमण्यांचे रुपातंर कौतुकात करायचे असेल आणि मित्र-मैत्रिणींमध्ये फेवरिट व्हायचे असेल तर स्वत:मध्ये विशीत असताना असे काही बदल करा की यश नक्कीच तुम्हाला मिळेल. कोणत्या ५ सवयी आपण स्वत:ला लावायला हव्या पाहूया. (Building confidence in early 20s)

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

आपली पहिली छाप बोलण्यातून पडते. नातेवाईकांमध्ये नंबर वन व्हायचे असेल तर मोठ्यांशी आदराने आणि लहानांशी प्रेमाने बोलायला हवं. त्यांच्याशी स्वत:हून बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आपले संवादकौशल्य सुधारेल.

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

अनेकांना फक्त स्वत:विषयी बोलायला आवडते. पण जो इतरांचे नीट ऐकून घेतो तो सगळ्यांना सर्वात जवळचा वाटतो. जेव्हा समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेता आणि योग्य सल्ला देता, तेव्हा लोक आपल्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात. यामुळे आपण सर्वांचे आवडते होतो.

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

विशीतली मुले तासनतास सोशल मीडियावर वेळ वाया घालवतात, ज्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. या वयात मुलांनी नवीन कौशल्ये शिकायला हवे. जेव्हा आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळे ज्ञान असेल तेव्हा आपली तुलना करणारे लोक आपोआप थांबतात.

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

कुठल्याही कौटुंबिक कार्यात किंवा मित्र-मैत्रिणींच्या अडचणीत जो सर्वात आधी धावून जातो, तोच खरा हिरो ठरतो. कामाची लाज न बाळगता मदत करण्याची वृत्ती आपल्याला सगळ्यांचे आवडते बनवते.

नातेवाईकांचे टोमणे- सतत एकमेकांशी तुलना यांचा सामना कसा करायचा? मुलांना लावा ५ सवयी, सोपे होईल जगणे

आपले व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी फिटनेसकडे लक्ष द्या. नीटनेटके कपडे, चेहऱ्यावर हास्य आणि सुदृढ शरीर यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. यावेळी टोमणे मारणारे लोकही आपल्याकडे आदराने पाहू लागतात.