५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

Updated:April 13, 2026 18:00 IST2026-04-13T18:00:00+5:302026-04-13T18:00:02+5:30

Ways to reduce workplace stress: Psychology of stress management: काही मिनिटांत मनाला शांत करण्यासाठी आणि तणावाचे योग्य नियोजन करण्यासाठी हा '4 A's' फॉर्म्युला कसा काम करतो, पाहूया.

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या किंवा भविष्याची चिंता यामुळे अनेकदा आपण मानसिकरित्या खचून जातो. पण हा तणाव केवळ बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर आपण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो, यावरही अवलंबून असतो.(Ways to reduce workplace stress)

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

ज्यावेळी तणाव आपल्या मर्यादेबाहेर जातो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ लागतात. सततची चिडचिड, निद्रानाश आणि कामात लक्ष न लागणं ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा वेळी '4 A's' हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि अत्यंत सोपा नियम आपल्याला मदतीला येतो. अवघ्या काही मिनिटांत मनाला शांत करण्यासाठी आणि तणावाचे योग्य नियोजन करण्यासाठी हा '4 A's' फॉर्म्युला कसा काम करतो, पाहूया. (Psychology of stress management)

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

अनेकदा आपण अशा गोष्टींचा ताण घेतो ज्या आपल्याला सहज टाळता येण्यासारख्या असतात. ज्या गोष्टींमुळे किंवा लोकांमुळे त्रास होतो त्यांना नाही म्हणायला शिका. चर्चेच वादात रुपांतर झालं तर तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करा.

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

जर आपण एखादी परिस्थिती टाळू शकत नसाल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. अशावेळी संवाद साधा, आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. आपल्याला कामाचा ताण जास्त असेल तर कामाची विभागणी करा किंवा वेळेचे नियोजन करा.

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

अनेकदा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. अशावेळी आपल्याला स्वत:मध्ये बदल करावा लागतो. यालाच अॅडप्ट करणे म्हणतात. आपल्या अपेक्षांचे प्रमाणीकरण करा. जर ट्रॅफिकमुळे किंवा इतर गोष्टींमुळे ताण येत असेल, तर त्या वेळेत आपले आवडते गाणे किंवा पॉडकास्ट ऐका. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास तणावाची तीव्रता कमी होते.

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण टाळू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही. अशा वेळी त्या गोष्टी स्वीकारणे (Acceptance) हाच एकमेव मार्ग असतो. रागावून किंवा दुःख करून परिस्थिती बदलणार नाही, हे समजून घ्या आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला वेळ द्या. चुकांमधून शिका आणि माफ करायला शिका.

५ मिनिटांत स्ट्रेस कमी करणारे ४ A, डोक्याला कितीही ताप झाला तरी तुमचा निर्णय चुकणार नाही!

तणाव कमी करण्यासाठी फक्त मानसिकच नाही तर शारीरिक प्रयत्नही महत्त्वाचे असतात. शांत झोप आणि चांगले वातावरण तणावमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे.