शांत स्वभाव कमजोरी नाही ताकद, ‘या’ ४ गुणांमुळे इंट्रोवर्ट माणसं होतात यशस्वी-जगतात आनंदात
Updated:March 12, 2026 20:00 IST2026-03-12T20:00:00+5:302026-03-12T20:00:02+5:30
Introvert mhanje kay: How introverts achieve success at work: इंट्रोवर्ट माणसातील काही ४ गुण मात्र त्यांना कायम यशाच्या शिखरावर पोहोचवतात.

सध्या जग हे जास्त बोलणाऱ्यांचं जग मानलं जातं. जो जास्त ओरडून सांगतो किंवा जो गर्दीत उठून दिसतो. त्यालाच हुशार समजण्याची एक चुकीची पद्धत समाजात तयार झाली आहे. अशा वेळी इंट्रोवर्ट असणाऱ्या लोकांना अनेकदा लाजाळू, घाबरट किंवा कमी आत्मविश्वासू समजून दुर्लक्षित केलं जातं. पण जगात सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी बहुतांश लोक हे इंट्रोवर्टच होते आणि आहेतही. त्यातीलच अल्बर्ट आइन्स्टाईन असोत किंवा बिल गेट्स! (Introvert mhanje kay)
खरंतर शांत राहणं ही त्यांची कमजोरी नसून ती त्यांची सर्वात मोठी सुपरपॉवर असते. शाळेच्या बाकावर मागच्या रांगेत शांत बसणारा एखादा मुलगा असो किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये मोजकेच बोलणारा एखादा कर्मचारी. याच्यातील काही ४ गुण मात्र त्यांना कायम यशाच्या शिखरावर पोहोचवतात. (How introverts achieve success at work)
इंट्रोवर्ट लोक समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकण्यात माहीर असतात. ते केवळ शब्द ऐकत नाहीत, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतात. कमी बोलणे आणि जास्त समजून घेणे हा त्यांचा चांगला गुण असतो. जो त्यांना चांगला मित्र आणि सल्लागार बनवतो.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हे लोक चारही बाजूने त्याचे विश्लेषण करतात. वरच्यावर गप्पा मारण्यापेक्षा एखाद्या विषयांवर चर्चा करण पसंत करतात. त्यांची विचार करण्याची ही पद्धत त्यांना कायम मोठं बनवते.
इंट्रोवर्ट व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी नेहमी कोणाच्या तरी सोबतीची किंवा गर्दीची गरज नसते. ते स्वत:मध्ये जास्त वेळ घालवतात. त्यांना ज्या गोष्टीत आनंद मिळतो, त्यात रममाण होतात. स्वतःवर प्रेम करणे आणि एकटेपणातही आनंदी राहणं हा त्यांचा विशेष गुण.
त्यांच्या मित्रमैत्रिणींची यादी खूप मोठी नसली तरी काही मोजकी नाती अशी असतात जी अत्यंत घट्ट आणि प्रामाणिक असतात. ते दिखाव्यापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व देतात.