कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

Updated:March 20, 2026 17:58 IST2026-03-20T17:04:59+5:302026-03-20T17:58:25+5:30

6 Places Where You Should Never Get Angry : आपल्यापेक्षा मोठे असलेले व्यक्ती आणि शिक्षक आपल्याला कधीतरी रागवतात किंवा एखादी गोष्ट पटवून देतात. अशावेळी उलटं न बोलता ऐकून घ्यावं

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

आयुष्यात शांतता आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी रागावर कंट्रोल असणं फार महत्वाचे आहे. विशेषत: ६ प्रसंगी न रागवणंच चांगलं. (6 Places Where You Should Never Get Angry)

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. रागात जेवल्यानं त्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि अन्नाचा अपमान होतो. आनंद मनानं जेवल्यास ते शरीराला नीट लागते.

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

झोपण्यापूर्वी मनात राग किंवा द्वेष असेल तर शांत झोप लागत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर होतो.

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

आपल्यापेक्षा मोठे असलेले व्यक्ती आणि शिक्षक आपल्याला कधीतरी रागवतात किंवा एखादी गोष्ट पटवून देतात. अशावेळी उलटं न बोलता किंवा राग न करता त्यांचं ऐकून घ्यावं

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

रस्त्यावर, बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी किरकोळ कारणांवरून राग केल्यानं तुमची प्रतिमा मलीन होते. तिथं वाद घातल्यानं वेळ आणि शक्ती वाया जाते. ज्याचा काही सकारात्मक परिणाम होत नाही.

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

मुलं निरागस असतात. त्यांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी किंवा रागवण्याऐवजी त्यांना प्रेमानं समजावून सांगितले तर जास्त लवकर शिकतील. सततच्या रागावण्यामुळे मुलांच्या मनात भिती किंवा बंडखोर वृतती निर्माण होते.

कितीही संतापलात तरी ‘या’ ६ ठिकाणी आदळआपट करु नका, रागाच्या भरात करुन घ्याल स्वत:चंच नुकसान

कधीकधी आपली चूक असूनही आपण ती मान्य करण्याऐवजी समोरच्यावर राग काढतो. अशावेळी राग करण्याऐक्षा आपली चूक मान्य करून ती सुधारा हेच शहाणपणाचं ठरेल.