छोट्या- छोट्या गोष्टीही विसरून जाता? ५ उपाय करून पाहा, विसराळूपणा कमी होऊन मेंदू होईल तल्लख
Updated:December 10, 2025 17:04 IST2025-12-10T16:57:53+5:302025-12-10T17:04:28+5:30

बऱ्याच जणांना हा अनुभव येतो की काही कामाच्या गोष्टी डोक्यातून पार निघून जातात. अगदी कशाचीच आठवण राहात नाही. सतत काहीतरी विसरायला होतं. असं झालं की मग काही महत्त्वाची कामं हुकतात आणि त्याची खूप तळतळ वाटते.
तुमचाही विसराळूपणा वाढला असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. यामुळे तुमचा मेंदू छान ॲक्टीव्हेट होईल आणि सगळ्याच गोष्टी डोक्यात अगदी फिट बसतील.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी नविन शिकायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड असेल ती गोष्ट करायला शिका, एखादी कला शिका, स्वयंपाकातले रोज नवनवे पदार्थ शिका आणि ते करून पाहा, तुमच्या कामाशी संबंधित नव्या गोष्टी शिका.. असं काहीही शिका.. यामुळे मेंदू जागरुक राहातो.
सकाळी उठल्यानंतर डायरी आणि पेन घेऊन बसा आणि आज आपल्याला काय काय करायचं आहे याची एक यादी करा. ती यादी दोन ते तीन वेळा शांतपणे वाचा आणि नंतर अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचं चटकन लक्ष जाईल.
मनावरचा ताण किंवा स्ट्रेस खूप वाढल्यावरही अनेक गोष्टी विसरायला होतात. त्यामुळे मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, योग नियमितपणे करून पाहा. चांगला परिणाम जाणवेल.
काही तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला उजव्या हाताने कामं करण्याची सवय असेल तर काही कामंं करण्यासाठी जाणीवपुर्वक डावा हात वापरा. डाव्या हाताला ॲक्टीव्ह करा. असंच जर डावखुरे असाल तर उजव्या हाताने काही कामं करा. यामुळेही मेंदू अधिक तल्लख होतो.
वेगवेगळे पझल गेम, स्मरणशक्ती गेम खेळून पाहा. नक्कीच चांगला फायदा होईल.