Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

Updated:June 3, 2025 13:26 IST2025-06-03T13:00:55+5:302025-06-03T13:26:38+5:30

Jyothi Yarraji : २७ वर्षांनंतर ज्योतीने इतिहास रचला आहे. २५ वर्षीय ज्योती याराजी भारताची 'हर्डल क्वीन' म्हणून ओळखली जाते.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

आंध्र प्रदेशातील एका कुटुंबात वाढलेल्या ज्योती याराजीने २०२५ मध्ये शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

ज्योतीने १२.९६ सेकंदात रेस पूर्ण केली. हा एक नवा विक्रम आहे. २७ वर्षांनंतर ज्योतीने इतिहास रचला आहे. २५ वर्षीय ज्योती याराजी भारताची 'हर्डल क्वीन' म्हणून ओळखली जाते.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील नेत्रदीपक कामगिरीनंतर ज्योतीने प्रतिक्रिया दिली आहे. "अर्थातच माझं ध्येय सुवर्णपदक जिंकणं होतं, पण मी वेळेवर लक्ष केंद्रित केलं."

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

जेव्हा तुम्ही पदकावर जास्त लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला प्रेशर जाणवतं. म्हणून मी वेळेचा विचार करून ते सकारात्मक बाजूमध्ये बदललं आणि मी खरोखरच यशस्वी झाले" असं ज्योतीने म्हटलं आहे.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

ज्योती याराजीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात अपयशाला तोंड दिलं. आर्थिक संघर्ष, दुखापती आणि असंख्य अडथळ्यांचा सामना केला पण कधीच हार मानली नाही.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

२०२२ मध्ये नॅशनल रेकॉर्डसह तिच्या यशाने एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. तेव्हापासून तिने अनेक मेडल्स जिंकली आहेत, अर्जुन पुरस्कार मिळवला आहे आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

ज्योतीने अनेक विक्रम मोडले आहेत. असं असूनही, ही स्टार खेळाडू आणि तिचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तिचे वडील महिन्याला फक्त ७ हजार रुपये कमवतात. आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेल्या ज्योतीने सरकारकडे आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं होतं.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

ज्योतीचा जन्म २८ ऑगस्ट १९९९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. ज्योती म्हणाली की, मला माझ्या पालकांना एक चांगलं जीवन द्यायचं आहे आणि यासाठी मला आधार (सरकारकडून आर्थिक मदत) हवा आहे.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

२०२३ मध्ये झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या २०० मीटर शर्यतीत ज्योतीने सिल्व्हर मेडल जिंकले होते. आंध्र प्रदेश सरकारने तिला इतर राज्यातील पदक विजेत्यांपेक्षा खूपच कमी रक्कम दिली. ज्योतीनेही याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

एका मुलाखतीत ज्योतीने सांगितलं की, मला २० लाख रुपये देण्यात आले. तर इतर राज्यातील खेळाडूंना सिल्व्हर मेडलसाठी ३ कोटी रुपये दिले जातात. समानता का नाही? माझ्या पालकांनी खूप त्याग केला आहे, परंतु आम्हाला अजूनही उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतो.