1 / 6तुमच्या अवतीभोवती कोणती माणसं आहेत, ते तुमच्याशी काय बोलतात यावर बरंच काही ठरतं. घडतं-बिघडतं. माझं कुटुंब, माझे मित्र मला जमिनीवर ठेवतात. माझं क्रिकेट त्यांना महत्त्वाचं वाटतंच, पण ते पॉझिटिव्ह बोलतात. मला प्रेरणा देतात. जमेल तुला म्हणतात ते महत्वाचं..(Virat Kohli Birthday)2 / 6आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच यश मिळवून देतात. तुम्हाला जे काही करायचं आहे, ते पूर्ण पॅशनेटली करा. त्यासाठी मनापासून मेहनत घ्या. बाहेरचं काही पाहू नका, फोकस घालवू नका. स्वत:शी प्रामाणिक राहणंच महत्वाचं.(Virat Kohli quotes)3 / 6मला स्वतःसारखं राहायला आवडतं, मी ढोंग करत नाही. मी जसा आहे तसा आहे. कुठं जायचं म्हणून जसा मी नटून जात नाही तसा मी काहीही शो ऑफ करत नाही. जे आहे ते आहे.4 / 6मन:शांती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला जे करायला आवडतं तेच मी करतो, जोपर्यंत मी स्वतःशी प्रामाणिक आहे तोपर्यंत कोण काय म्हणतं मला फरक पडत नाही.5 / 6मला शिस्त महत्वाची वाटते. यश अपयश काहीही असो शिस्त मोडायची नाही. कधी कधी लक्ष विचलित होतंच, पण त्याचा परिणाम माझ्या शिस्तीवर आणि कामावर होणार नाही हे मी कसोशीने पाळतो.6 / 6आपण फार मोठे, मला फार जमतं. मी करतो म्हणून घडतं असा अहंकार आला की आपली कला, विद्या आणि पॅशनही आपल्याला सोडून जातं. क्रिकेटपुढे मी शरणागत आहे, म्हणून क्रिकेटचं माझ्यावर प्रेम आहे. आपल्या कामापायी आपली निष्ठा असावी हेच मला क्रिकेटनं शिकवलं.