DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

Updated:January 21, 2026 13:41 IST2026-01-21T13:35:14+5:302026-01-21T13:41:05+5:30

DSP Mayanka Chaurasia : मयंका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, जिथे अनेकदा मुलींना आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी संयम आणि सतत प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. ही म्हण आज तंतोतंत लागू पडते ती म्हणजे मयंका चौरसिया यांच्या संघर्षाला. मयंका यांनी केवळ दीर्घकाळ संघर्षच केला नाही, तर संयम आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवलं.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

सलग ८ वेळा MPPSC परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर ९व्या प्रयत्नात मयंका अखेर सरकारी अधिकारी बनल्या आहेत. या प्रवासात त्यांनी कुटुंबापासून समाजापर्यंत अनेकांचे टोमणे ऐकले, पण आपल्या स्वप्नांना कोणासमोरही झुकू दिलं नाही.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथील रहिवासी असलेल्या मयंका चौरसिया यांची ही कथा इतर उमेदवारांपेक्षा खूप वेगळी आहे. सलग ८ वेळा अपयश येऊनही पुन्हा त्याच जोमाने प्रयत्न करण्याचा संयम क्वचितच एखाद्या उमेदवाराकडे पाहायला मिळतो.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

हताश झालेल्या आणि आशा सोडून दिलेल्या तरुणांमध्ये नवा उत्साह भरण्याचे काम मयंका यांची ही गोष्ट करते. मयंका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, जिथे अनेकदा मुलींना आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

मयंका त्यापैकी नव्हत्या. त्यांच्या जिद्दीने आणि ध्येयवेड्या स्वभावाने समाजाच्या टोमण्यांनाही धूळ चारली. बी.टेक पदवीधर असलेल्या मयंका यांनी २०१६ मध्ये MPPSC ची तयारी सुरू केली होती.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

२०१६ ते २०२५ या प्रदीर्घ संघर्षाचे फळ अखेर मिळालं. ९व्या प्रयत्नात केवळ यशच मिळवलं नाही, तर राज्यात १०वा रँक मिळवून त्या DSP बनल्या. आपल्या या प्रवासात मयंका यांनी ८ वेळा मुख्य परीक्षा (Mains) दिली आणि ४ वेळा मुलाखतीपर्यंत मजल मारली.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

तीन वेळा मुलाखतीत अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही. आपल्या कमकुवत बाबींना आपली ताकद बनवलं आणि प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकत गेली.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

इंदूरच्या गल्ल्यांमध्ये कोचिंग आणि लायब्ररीलाच त्यांनी आपलं घर मानलं होतं. सततचं अपयश पाहून समाज आणि कुटुंबीयांनी त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.

DSP Mayanka Chaurasia : ८ वेळा अपयश, समाजाचे टोमणे अन् लग्नाचा दबाव; जिद्दीच्या जोरावर DSP बनण्याचं स्वप्न साकार

मयंका यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं की, जोपर्यंत ती अधिकारी होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. अखेर परिस्थितीशी दोन हात करत तिने आपला निर्धार पूर्ण केला आणि आज ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.