Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

Updated:February 24, 2026 16:16 IST2026-02-24T16:08:54+5:302026-02-24T16:16:09+5:30

Deepa Bhati : कठोर परिश्रम आणि यशाच्या ध्यासातून वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्वतःवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं आणि जिद्द असेल तर यशाची वाट आपोआप गवसते. या ओळी दीपा भाटी यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात. तीन मुलांची आई असूनही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वप्नांना दबून जाऊ दिलं नाही.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

लग्न, घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळत जेव्हा त्यांनी पुन्हा पुस्तकं हातात घेतली, तेव्हा लोकांनी त्यांना खूप टोमणे मारले. मात्र त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

कठोर परिश्रम आणि यशाच्या ध्यासातून त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्वतःवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

एका मुलाखतीत दीपा सांगतात की, त्या मूळच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा, यूपी) जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या 'कोंडली बांगर' या एका छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबातून येतात.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

सुरुवातीचं शिक्षण केंद्रीय विद्यालयातून (KV) झाले. त्यानंतर त्यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन आणि हिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. दीपा यांचं लग्न कमी वयातच झालं होतं, पण त्यांची स्वप्नं मोठी होती.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

मनात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द कायम होती. त्यांना ३ मुलं झाली. लवकर लग्न आणि मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आणि एक वेळ अशी आली की त्यांचं शिक्षणही सुटलं.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

ध्येय गाठण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुढे जायचं होतं. घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळत दीपा यांनी एका शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. पण काही कारणांमुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

दीपा यांच्या भावाने त्यांना नागरी सेवेचा मार्ग दाखवला आणि 'UPPCS' परीक्षा देण्याचा सल्ला दिला. येथूनच दीपा यांच्या मनात स्वप्न रुजले आणि त्या अहोरात्र तयारीला लागल्या.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

घरकाम आणि ३ मुलांचा सांभाळ करत नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण दीपा यांची जिद्द या सर्वांहून मोठी होती. त्या घरचं काम आटोपून वेळ मिळेल तेव्हा अभ्यासाला बसत असत.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

दीपा यांना या काळात त्यांना लोकांचे टोमणे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या, पण त्यांचं लक्ष अर्जुनाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर होतं.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

लग्नाच्या १८ वर्षांनंतर दीपा यांनी वयाच्या ४० व्या वर्षी 'UPPCS' परीक्षा उत्तीर्ण केली. १६६ वा रँक मिळवून त्या अधिकारी झाल्या आणि त्यांनी टोमणे मारणाऱ्या सर्वांना उत्तर दिलं.

Deepa Bhati : ३ मुलांची आई... ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; अधिकारी बनून टोमणे मारणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

जेव्हा २०२१ मध्ये त्यांनी ही परीक्षा क्रॅक केली, तेव्हा त्यांची मोठी मुलगी बारावीत शिकत होती. आज त्यांची ही यशोगाथा संघर्ष करणाऱ्या आणि आव्हानांशी झुंज देणाऱ्या लाखो लोकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.