सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

Published:January 20, 2022 06:51 PM2022-01-20T18:51:13+5:302022-01-20T18:55:47+5:30

सानिया मिर्झा... ती फक्त टेनिसपटूच नाही, तर भारतीय महिला टेनिसचा खराखुरा चेहरा म्हणून जगभर ओळखली गेली...तिने तिचा खेळ नेहमीच कमाल केला.. म्हणूनच तर आजही जेव्हा भारतीय टेनिसचा विषय निघतो, तेव्हा तो सानियाला घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही... म्हणूनच तर आज तिच्या निवृत्तीची चर्चा सुरू होताच, प्रत्येक जण क्षणभरासाठी का होईना पण थबकला नक्कीच..

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

सानियाच्या खेळाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा नेहमीच तिच्या स्टाईलचीही झाली... भारताची पहिली वहिली स्टायलिश महिला खेळाडू म्हणून सानिया ओळखली जाते..

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

सानियाचे कपडे, हेअरस्टाईल यांची नेहमीच चर्चा झाली. पण तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्यात भाव खाऊन गेली ती तिच्या नाकातली नोज पीन. तिची मोरणी, तिची नोजपीन हे जणू तिचं स्टाईल स्टेटमेंट झालं हाेतं..

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

मुळची हैद्राबादची असणारी सानिया भारताची सगळ्यात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. एवढंच नाही तर महिला दुहेरीच्या जगभरातील अव्वल खेळाडूंपैकी ती एक मानली जाते.

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

सानियाचे तब्बल ४३ वेळा दुहेरी किताब जिंकले आहेत. २०१५ यावर्षी दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू म्हणून सानिया ओळखली गेली.

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

विम्बल्डन आणि यूएस ओपन ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीची ती विजेती ठरली होती. स्वित्झरलँडची मार्टिना हिंगिस या दोन्ही स्पर्धांमध्ये तिची पार्टनर होती.. तिच्याच सोबत सानियाने २०१६ ची ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकली होती.

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

सानियाबाबत एक दुखरी बाजू अशी की तिने तब्बल चारवेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला, पण तिला त्यात एकदाही पदक मिळवता आलं नाही.. दुखापत, अपयश यामुळे अनेकदा तिला टिकेलाही सामोरं जावं लागलं..

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

२०१४ साली सानियानं पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी प्रेमविवाह केला. पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करतेय, यावरूनही सानियाला खूप टिका सोसावी लागली होती...

सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात?

सानियाचा मुलगा सध्या ३ वर्षांचा आहे. मुलाच्या जन्मानंतर थोडा ब्रेक घेऊन तिने पुन्हा एकदा नव्याने खेळ सुरू केला. आता सानिया स्पर्धेच्या ठिकाणी बऱ्याचदा मुलाला सोबत घेऊन जाते.. कर्तव्य आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी एकसाथ करण्याचा तिचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे.