Join us   

‘ती‘ निरोप घेतेय, पण सोपं नव्हतं ‘सानिया मिर्झा’ होणं, एका ‘हट्टी’ मुलीची जिद्दी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 4:29 PM

1 / 6
सानिया मिर्झा हे भारतीय टेनिसमधील स्टार नाव. टेनिस कोर्टवर आपल्या खेळाने प्रतिस्पर्ध्याला चितपट करणारी सानिया आज ग्रॅंड स्लॅमच्या मैदानातून निवृत्त झाली. पण सोपा नव्हता इथवरचा प्रवास (Sania Mirza Indian Tennis Player Farewell To Grand slam)..
2 / 6
एका मुस्लिम कुटुंबातली ही तरुणी. कुणाला वाटलंही नव्हतं की कुणी सानिया भारतीय टेनिसला आंतररराष्ट्रीय नकाशावर नेईल. पण ग्रॅण्ड स्लॅमपर्यंत पोहोचलेली सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू होते. ग्रँडस्लॅमसारखी स्पर्धा खेळत भारतीय तरुणींना टेनिस खेळण्याचं स्वप्न देते.
3 / 6
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मालिकशी विवाह झाला, त्यावरुन वाद. तिच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्हं अनेकांनी लावली, पण ती ठाम होती म्हणाली, मी भारतीय आहे, भारतासाठीच खेळणार. दुबईत ती स्थायिक झाली, घटस्फोटाच्या वावड्या उठल्या. पण सानियानं आपली डिसेंसी सोडली नाही.
4 / 6
सानियाने आपल्या करीयरमध्ये एकूण ६ ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी सानियाने आपले टेनिसमधल्या खेळाच्या करीयरला सुरुवात केली आणि आता ती ३६ वर्षांची होत असताना आपलं टेनीसमधलं करिअर थांबवते आहे. मैदानाबाहेर मात्र ती अकॅडमी काढून एका नव्या इनिंगला सुरुवात करतेय.
5 / 6
फेब्रुवारी महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीए या सानियाच्या सर्वात शेवटच्या स्पर्धा असणार आहेत. टेनिसच्या मैदानात भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर सानिया आता मैदातानून निवृत्तीच्या टप्प्यावर आली आहे.
6 / 6
विविध प्रकारच्या वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सानियाने आपले खेळावरचे लक्ष अजिबात ढळू दिले नाही. सोपं नव्हतं सानिया मिर्झा होणं, पण कष्टानं आपली स्वप्न पूर्ण होतात हे ती पुन्हा पुन्हा सिध्द करत राहिली.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टीसानिया मिर्झाटेनिस