Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

Updated:January 27, 2026 13:26 IST2026-01-27T13:19:30+5:302026-01-27T13:26:08+5:30

Hansja Sharma : कॅप्टन हंसजा यांची यशोगाथा आज भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी मोठी प्रेरणा आहे.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

जम्मूच्या सेंट जेवियर्स शाळेत मिळालेली एक शिकवण कॅप्टन हंसजा यांच्यासाठी भविष्याची दिशा ठरवणारी ठरली. त्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत गगनभरारी घेतली आहे. आज त्या भारताच्या पहिल्या महिला 'रुद्र' आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट आहेत.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

२६ जानेवारी २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात २५१ आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनचं नेतृत्व केलं आहे. कॅप्टन हंसजा यांची यशोगाथा आज भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी मोठी प्रेरणा आहे.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

हंसजा यांचा जन्म ९ मार्च १९९८ रोजी जम्मूत झाला. त्यांच्या आई रुश्मी शर्मा एक पत्रकार आहेत. हंसजा यांचं शालेय शिक्षण जम्मूच्या सेंट जेवियर कॉन्व्हेंट हायर सेकेंडरी स्कूलमधून झाले.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या शाळेच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं - 'Be brutal to yourself' (स्वतःशी कठोर बना). त्या दररोज हे वाक्य वाचत असत. या वाक्यामुळे त्यांना दररोज स्वतःच्या सीमा ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहिली.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

बारावीनंतर हंसजा यांनी गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमन (GCW), जम्मू येथून पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. त्यांनी नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CAATS) मध्ये अत्यंत कठीण प्रशिक्षण घेतलं.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

या प्रशिक्षणादरम्यान त्यांना हाय-स्पीड कॉम्बॅट मिशनसाठी तयार करण्यात आलं. हा कोर्स लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात कठीण प्रोग्राम मानला जातो. या कोर्समध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि 'बेस्ट कॉम्बॅट एव्हिएटर'साठी दिली जाणारी 'सिल्व्हर चिता ट्रॉफी' जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

कॅप्टन हंसजा यांचा इथपर्यंतचा प्रवास जिद्द आणि धैर्याने भरलेला आहे. भारतीय सैन्यात सामील होण्याच्या त्यांच्या पहिल्या प्रयत्नात, वैद्यकीय चाचणीमध्ये एका कारणामुळे त्यांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

अवघ्या १५ दिवसांत नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली, जी ३ तास चालली होती. या जिद्दीच्या जोरावर त्या अखेर भारतीय सैन्यात सामील झाल्या. कॅप्टन हंसजा या 'रुद्र' आर्म्ड हेलिकॉप्टर उडवणाऱ्या देशातील पहिल्या महिला पायलट आहेत.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

'रुद्र' हे भारतीय सेना आणि वायुसेनेचे एक महत्त्वाचे लढाऊ हेलिकॉप्टर असून ते पूर्णपणे स्वदेशी आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. 'रुद्र' हे नाव भगवान शंकरावरून घेण्यात आलं आहे.

Hansja Sharma : अभिमानास्पद! जम्मूच्या कन्येने रचला इतिहास, कॅप्टन हंसजा झाली पहिली रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर पायलट

कॅप्टन हंसजा शर्मा यांच्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टरचं सारथ्य करणं हा एक ऐतिहासिक क्षण असून, हे महिला सक्षमीकरणाचं एक मोठं उदाहरण आहे. सर्व जण हंसजा यांचं भरभरून कौतुक करत आहेत.