Guru Purnima 2025 : 'त्या होत्या म्हणून आपण शिकलो!' महिलांसाठी आयुष्यभर झटलेल्या महिलांना आपण विसरलो का?
Updated:July 6, 2025 15:21 IST2025-07-06T15:17:01+5:302025-07-06T15:21:34+5:30
Guru Purnima 2025: Have we forgotten the women who fought for women throughout their lives? women education : महिलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या या महिलांना विसरुन चालणार नाही. पाहा कोण आहेत.

प्रत्येक महिलेसाठी गुरुस्थानी असाव्यात अशा अनेक महिला भारतात होऊन गेल्या. त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची आहे. आज गावोगावी मुली आरामात शिक्षण घेऊ शकतात याचे श्रेय या काही महान महिलांना जाते.
१८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु झाली. लोकांची बोलणी ऐकून जीव मुठीत धरुन महिलांसाठी जिवाचे रान त्यांनी केले होते. त्यांनी जातीभेद आणि लिंगभेदाविरुद्ध लढा दिला. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेली कामगिरी प्रचंड मोलाची आहे.
चित्रा नाईक या एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. चित्रा नाईक यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी मोठे कार्य केले. त्यांनी भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अनेक शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कष्ट घेतले. त्यांना पद्मश्री तसेच युनेस्को पुरस्कार आणि इतर अनेक सन्मान प्राप्त झाले.
पंडिता रमाबाई यांनी महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्या स्वत: प्रचंड हुशार होत्या. त्या एक समाजसुधारक होत्या तसेच संस्कृत या भाषेवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी विधी जमवण्यासाठी अफाट कष्ट घेतले. तसेच विधवा महिलांसाठी 'शारदा सदन' आणि 'मुक्ती मिशन' स्थापन केले.
सुमन मुठे यांनी आदिवासी महिलांना शिक्षण देण्यासाठी भरपूर काम केले. त्या नाशिकमधील सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला आहे. इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्या लेखिका असून बाल कल्याण आणि महिलांसाठी काम करतात.
बेबीताई कांबळे या एक दलित साहित्य लेखिका होत्या. त्यांनी दलित महिलांच्या समस्या आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार लोकांसमोर आणण्यासाठी फार कष्ट केले. त्यांनी त्याच्या लेखनातून समाज जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि महिलांना रोजगार तसेच शिक्षण मिळवून देण्याची मोहिम हाती घेतली.
दुर्गाबाई देशमुख यांनी महिलांसाठी शाळा सुरु केल्या. त्या स्वातंत्र्य सेनानी होत्या. सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या एक नामवंत शिक्षणतज्ज्ञ होत्या. भारतातील अनेक महिलांसाठी त्या एक आदर्श ठरल्या. महिलांसाठी हिंदी शाळा सुरु व्हावी यासाठी त्यांनी कष्ट घेतले.