Join us   

देसी गर्ल प्रियांका चोप्राची मोठी भरारी, प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान.. मोठ्या जिद्दीची कहाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 12:20 PM

1 / 6
१. बीबीसीने २०२२ यावर्षी जगभरातील सगळ्यात जास्त प्रभावशाली ठरलेल्या १०० महिलांची यादी नुकतीच जाहीर केली. यामध्ये प्रियांका चोप्राचं नाव झळकलं आणि भारतीयांची, प्रियांकाच्या चाहत्यांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली.
2 / 6
२. सध्या ग्लाेबल आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकासह आणखी ३ भारतीय महिलांचाही या यादीत समावेश आहे, हे विशेष. ॲरोनॅटिकल इंजिनियर शिरिषा बांदल, लेखिका गितांजली श्री आणि समाजसेविका स्नेहा जावले या तिघींनीही त्यांच्या कर्तृत्वाने जगभरात ठसा उमटविला आहे.
3 / 6
३. प्रियांका चोप्रा या यादीमधली एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. या यादीनुसार प्रियांकाचा उल्लेख बॉलीवूडची सगळ्यात मोठी स्टार अभिनेत्री असा करण्यात आला आहे.
4 / 6
४. २००२ साली 'दि हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियांकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत तिने ६० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलीवूडच नाही तर अनेक हॉलीवूड चित्रपटांमधून, मालिकांमधूनही प्रियांकाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
5 / 6
५. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर पुरस्कार, आयफा पुरस्कार पटकाविणाऱ्या प्रियांकाला २०१६ साली पद्मश्री पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.
6 / 6
६. एकीकडे बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये तर प्रियांकाची घोडदौड सुरू आहेच. पण दुसरीकडे समाजकार्यातही ती नेहमीच अग्रेसर असते. युनिसेफची ती गुडविल ॲम्बेसेडर असून मुलांचे अधिकार, मुलींचे शिक्षण अशा लहान मुलांविषयीच्या प्रश्नांवर ती मागच्या अनेक वर्षांपासून काम करते.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टीप्रियंका चोप्रासेलिब्रिटी