लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

Updated:October 22, 2025 12:29 IST2025-10-22T12:24:16+5:302025-10-22T12:29:44+5:30

एन. अंबिका यांचं वयाच्या १४ व्या वर्षी एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न झालं आणि १८ व्या वर्षी त्या दोन मुलांची आई झाल्या.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एन. अंबिका यांनी आपल्या मेहनतीने स्वप्न साकार करत त्या IPS ऑफिसर झाल्या.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

एन. अंबिका यांचं वयाच्या १४ व्या वर्षी एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न झालं आणि १८ व्या वर्षी त्या दोन मुलांची आई झाल्या. एके दिवशी, त्या आपल्या पतीसोबत प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस परेडमध्ये गेल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला जाणारा सन्मान पाहिला.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

आपल्याला हा सन्मान कसा मिळवता येईल याबद्दल त्यांनी जेव्हा पतीशी चर्चा केली तेव्हा त्यांना समजलं की, हा सन्मान मिळवणं सोपं नाही. यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

अंबिका यांनी हे जाणून घेतल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मोठा निर्णय घेतला. हे ध्येय साध्य करण्यासाठी, अंबिका प्रथम दहावी उत्तीर्ण झाल्या आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

अपुऱ्या शैक्षणिक सुविधा असलेल्या एका लहान शहरात राहत होत्या. त्यानंतर अंबिका यांच्या पतीने चेन्नईमध्ये राहण्याची आणि शिक्षण घेण्याची व्यवस्था केली. पती स्वतः काम करत असताना मुलांची काळजी घेत असे.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

चेन्नईमध्ये राहत असताना, अंबिका कठोर परिश्रम करत होत्या, परंतु दोनदा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीच. जेव्हा त्या तिसऱ्यांदा नापास झाल्या, तेव्हा पतीने त्यांना घरी परत येण्यास सांगितलं.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

अंबिका यांनी नकार दिला आणि शेवटची संधी म्हणत परीक्षा देण्याची परवानगी आपल्या पतीकडे मागितली. पतीची परवानगी मिळाल्यानंतर, अंबिका यांनी चौथ्यांदा परीक्षा दिली.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

२००८ मध्ये उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाल्या. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानेही एन. अंबिका यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर

लेडी सिंघम या नावाने एन. अंबिका ओळखल्या जातात. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. लग्नानंतर देखील स्वप्न साकार करता येतं, फक्त मेहनत करायची तयारी हवी हे त्यांनी सिद्ध केलं आहे.