लघवीचा रंग सांगतो किडनीचे बिघडलेले आरोग्य, ५ लक्षणे- उशीर होण्याआधीच डॉक्टरांकडे जा..
Updated:June 13, 2025 11:49 IST2025-06-13T11:46:20+5:302025-06-13T11:49:21+5:30
Kidney disease symptoms: change Urine color and kidney problems: How to detect kidney issues early: जाणून घेऊया आपल्या किडनीचे आरोग्य कसे आहे याविषयी.

किडनी आपल्या संपूर्ण आरोग्यातील महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शरीराला योग्य पद्धतीने फिल्टर करण्याचे काम करते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. (Kidney disease symptoms)
पण तुम्हाला माहित आहे का लघवीच्या रंगावरुन आपल्याला किडनीच्या अनेक समस्या ओळखता येतात? लघवीचा रंग हा आपल्या शरीराच्या आरोग्याचा आरसा आहे. जाणून घेऊया आपल्या किडनीचे आरोग्य कसे आहे याविषयी. (change Urine color and kidney problems)
जर लघवीचा रंग हलका पिवळा आणि पारदर्शक असेल तर तो पुरेशा हायड्रेशनचे संकेत देतो. ज्यावेळी किडनी योग्यप्रकारे काम करत नाही तेव्हा त्याचा रंग आणि वास बदलतो.
लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारंगी असेल तर डिहायड्रेशनचे संकेत असू शकतात. ज्यामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येतो. यामुळे आपल्या किडनीचे आजार असण्याची शक्यता अधिक असते.
लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी असेल तर लघवीमध्ये रक्ताचे लक्षण आहे. किडनी स्टोन किंवा ग्लोमेरुलर रोग यांसारख्या गंभीर किडनी समस्येचे संकेत असू शकतात.
आपल्या लघवीमध्ये फेस येत असेल तर शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. हे किडनीच्या फिल्टरला नुकसान झाल्याचे सांगतात. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही लोकांच्या लघवीचा रंग तपकिरी असतो. रक्तात मायोग्लोबिन किंवा बिलीरुबिनची समस्या असते. यामुळे किडनी आणि लिव्हर दोघांच्या समस्या उद्भवतात.
लघवीचा रंग हिरवा किंवा निळा असेल तर UTI किंवा काही औषधे, फूड यांमुळे असे होऊ शकते. हे किडनीवर परिणाम करणाऱ्या बॅक्टेरियांच्या संसर्गाचे देखील संकेत देऊ शकते.