Sleep Faster Tricks : रात्री लवकर झोपच येत नाही? रोज ५ मिनिट हा व्यायाम करा, पडल्यानंतर लगेच ढाराढूर झोपाल
Updated:July 15, 2022 17:51 IST2022-07-15T16:56:54+5:302022-07-15T17:51:17+5:30
Sleep Faster Tricks Exercising for Better Sleep : दिवसभरातून दहा ते पंधरा मिनिटं वेळ काढून तुम्ही हे व्यायाम करू शकता. (6 Tips To Fall Asleep Fast)

आजकाल ताण तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे लवकर झोप येणं कठीण झालंय. बराचवेळ पडून राहिल्यानंतरही लोकांना झोप येत नाही. (How to get sleep faster)चांगल्या झोपेसाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. हे केवळ तुम्हाला चांगली झोपण्यास मदत करत नाही तर स्नायू शिथिलता आणि लवचिकता देखील सुधारते. या लेखात तुम्हाला स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार सुचवणार आहोत. दिवसभरातून दहा ते पंधरा मिनिटं वेळ काढून तुम्ही हे व्यायाम करू शकता. (6 Tips To Fall Asleep Fast)
फॉरवर्ड फोल्ड (Exercising for Better Sleep)
ही स्ट्रेचिंग तुम्ही उभे राहून किंवा बसून करू शकता. या स्ट्रेचिंगमुळे पाठ आणि पाय लवचिक बनण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते. पाच मिनिटे ही स्ट्रेचिंग केल्याने तणाव दूर होण्यासोबतच रक्तदाबही संतुलित राहतो.
सुर्य नमस्कार पोझ
हा व्यायाम केल्याने पाठीचे स्नायू तर उघडतात त्याचबरोबर त्यांना ताकदही मिळते.
पिजन स्ट्रेचिंग
जे लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात त्यांच्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे. असे केल्याने नितंबांचे स्नायू चांगले राहतात.
प्लँक
शरीराची लवचीकता वाढवण्यासाठी हा व्यायाम सर्वोत्तम आहे. हा व्यायाम केल्याने पाठ, पोटाचे स्नायू मोकळे होतात.
चाईल्ड पोझ
चाईल्ड पोझ केल्याने तुमचे खांदे ताणले जातील. झोपण्यापूर्वी ही स्ट्रेचिंग केल्याने संपूर्ण शरीराला भरपूर विश्रांती मिळेल. रोज १० मिनिटं वेळ काढून या स्ट्रेचिंग केल्याने रात्री वेळेवर झोप येण्यास मदत होईल.