सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात- नाक गळतं? २ विड्याच्या पानांचा सोपा उपाय- त्रास कायमचा जाईल
Updated:January 5, 2025 09:15 IST2025-01-05T09:14:49+5:302025-01-05T09:15:01+5:30

काही जणांना रोज सकाळी झोपेतून उठलं की सगळ्यात आधी सटासट शिंका येतात. त्यानंतर बराच वेळ नाक गळत असतं. काही जणांना ऋतूमध्ये बदल झाला की असा त्रास होतो.
असा त्रास होत असेल तर त्यावर काय घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की नाक गळण्याचा किंवा शिंका येण्याचा त्रास होऊ नये म्हणून विड्याच्या पानांचा खूप चांगला उपयोग होतो.
यासाठी दोन विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. त्यांचे बारीक तुकडे करा आणि थोडंसं पाणी घेऊन खलबत्त्यात कुटून घ्या.
त्याचा साधारण १ टेबलस्पून एवढा रस काढून घ्या आणि तो थोडा कोमट करून प्या. हा उपाय दिवसातून दोन वेळा करा. काही दिवसांतच शिंका येण्याचा, नाक गळण्याचा त्रास कमी होईल.