महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

Updated:June 12, 2025 12:25 IST2025-06-12T12:08:14+5:302025-06-12T12:25:28+5:30

Signs of Low Hemoglobin : जेव्हा शरीरात हीमोग्लोबिन लेव्हल सामान्यापेक्षा कमी असेल तर शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

Signs of Low Hemoglobin : एखादं हलकं काम केलं किंवा काही नाही केलं तरी थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात रक्त कमी झालेलं असू शकतं. सामान्यपणे पुरूषांच्या महिलांमध्ये रक्त कमी होण्याची समस्या अधिक बघायला मिळते (Anemia in Women). शरीरात आयर्न कमी झाल्यावर हीमोग्लोबिन कमी होतं, ज्याला एनीमिया असं म्हणतात. या स्थितीला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता असं म्हणतात. हीमोग्लोबिन लाल रक्तपेशींमधील एक प्रोटीन असतं, जे फुप्फुसांमधून ऑक्सीजन घेऊन शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवतं.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

पण जेव्हा शरीरात हीमोग्लोबिन लेव्हल सामान्यापेक्षा कमी असेल तर शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात काही लक्षणांच्या मदतीनं तुम्ही रक्त कमी झाल्याचं ओळखू शकता.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

हीमोग्लोबिन कमी झाल्यावर सेल्सना भरपूर ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे व्यक्तीला फार जास्त थकवा जाणवतो. या स्थितीत एखादं हलकं काम केल्यावरही थकवा जाणवतो. तसेच कमजोरी सुद्धा जाणवते.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

ऑक्सीजन कमी झाल्यानं श्वास भरून येण्याची समस्या होऊ शकते, खासकरून पायऱ्या चढताना किंवा एखादं काम करताना. याचं कारण शरीराला ऑक्सीजन देण्यासाठी फुप्फुसांना अधिक मेहनत करावी लागते.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

हीमोग्लोबिन कमी झाल्यावर त्वचा, नखं आणि डोळ्यांच्या आत पिवळेपणा दिसू लागतो. हीमोग्लोबिनच रक्ताला लाल रंग देतं. पण तेच कमी झालं तर स्किन आणि नखं पिवळे दिसू लागतात.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

मेंदुपर्यंत पुरेसं ऑक्सीजन पोहोचत नसल्यानं चक्कर येणे, डोकेदुखी किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात. तुम्हालाही नेहमीच चक्कर येत असेल किंवा डोकं दुखत असेल तर हा हीमोग्लोबिन कमी झाल्याचा संकेत असू शकतो.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

शरीरातील ऑक्सीजनची कमतरता भरून काढण्यासाठी फुप्फुसांसोबतच हृदयाला सुद्धा जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट बीट सामान्यापेक्षा वाढतात.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नसल्यानं हात-पाय थंड पडतात आणि त्यांमध्ये झिणझिण्याही जाणवतात. त्यामुळे असं काही होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

महिलांमध्ये जास्त होते रक्त कमी होण्याची समस्या, ही ७ लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

शरीरात आयर्न कमी झाल्यानं केसगळती आणि नखं तुटणे किंवा पातळ होणे अशा समस्या होतात. तुम्हालाही असं काही होत असेल तर हा हीमोग्लोबिन कमी असल्याचा संकेत असू शकतो.