वाढलेलं कोलेस्टेरॉल लवकर कमी करणारे ४ सुपरफूड! रोज खा- कोलेस्टेरॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये
Updated:May 28, 2025 16:45 IST2025-05-28T16:41:13+5:302025-05-28T16:45:22+5:30

हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा त्रास अगदी तरुण मंडळींनाही छळतो आहे. कित्येक लोकांचं कोलेस्टेरॉल तर नेहमीच वाढलेलं असतं.
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी तसेच कोलेस्टेरॉल नेहमीच नियंत्रित ठेवण्यासाठी ४ पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात अशी माहिती आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी कोणते पदार्थ नियमितपणे खायला सांगितले आहेत ते पाहूया..
पहिला पदार्थ आहे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा ३ असते. ओमेगा ३ रक्तवाहिन्यांना आलेला फुगीरपणा किंवा सूज कमी करण्यास मदत करते. ही सूज कमी झाली की आपोआपच कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
दुसरा पदार्थ म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑईल. ते आपल्या आहारात असेल तर चांगले काेलेस्टेरॉल वाढण्यास आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
तिसरा पदार्थ आहे इसबगोल. यामध्ये इनसॉल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
चौथा पदार्थ म्हणजे जवस. जवसामध्ये ओमेगा ३ आणि फायबर हे दोन्ही भरपूर प्रमाणात असल्याने कोलेस्टेरॉलचा त्रास असणाऱ्यांनी ते नियमितपणे खावे.