1 / 5नवरात्रीचे उपवास करताना साबुदाणा, बटाटा असे पदार्थ वारंवार खाल्ले जातात (Navratri 2025). या पदार्थांमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शुगर वाढण्याची भीती असते. म्हणूनच नवरात्रीचे उपवास करताना शुगर वाढू नयेत यासाठी काही पदार्थ आवर्जून खायला हवेत.2 / 5ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. पाल मणिकम यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यापैकी पहिला पदार्थ आहे वेगवेगळी फळं. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सोपी होते. संत्री, पपई, पेरू, टरबूज अशी फळं खाण्यास प्राधान्य द्या.3 / 5शरीरातले प्रोटीन्स कमी होऊ देऊ नका. त्यासाठी बदाम, काजू, अक्रोड असा सुकामेवा खा. सुकामेवा मधासोबत खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.4 / 5आहारातलं दही आणि दूध यांचं प्रमाणही वाढवा. दही आणि दूध या पदार्थांमधूनही प्रोटीन्स मिळतात.5 / 5दररोज सकाळी चिया सीड्स, तीळ, जवस असे पदार्थही खा. त्या पदार्थांमुळेही रक्तामधील साखर एकदम वाढत नाही.