पाळीचा खूप त्रास होतो? फक्त ७ गोष्टी करा, मासिक पाळीचे ४ दिवसचे दुखणे होईल कमी
Updated:February 16, 2025 17:33 IST2025-02-16T17:27:08+5:302025-02-16T17:33:14+5:30
Do you have a lot of menstrual pain? Just do 7 things, the pain will reduce : पाळीचा होतो प्रचंड त्रास ? हे घ्या काही घरगुती उपाय.

पाळीच्या दिवसात काय करू काय नको असं होतं. प्रचंड त्रास होतो. त्या त्रासाने काही सुधरत नाही. पण कामं तर करावीच लागतात. मग चिडचिड होते. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा ज्याने हा त्रास कमी होऊ शकतो.
पाळीच्या त्रासावर पेनकिलर घेण्याचा सल्ला कधीच डॉक्टर देत नाहीत. तरी त्रास सहन न झाल्याने मुली पेनकिलर घेतातच. पण तसं न करता काही सोप्या उपायांनी त्रास कमी करता येतो.
१. पाळीमध्ये पोटात सतत दुखते. त्यासाठी आलेलिंबाचा रस गुणकारी ठरतो. एका बाटलीत असा रस तयार करून ठेवा. थोड्या थोड्या वेळाने एक घोट प्या.
२. क्रेविंग्झ होतात म्हणून तेलकट खाऊ नका. त्याने आणखी त्रास होईल. फळे खा. दूध प्या. दूध नको तर ताक प्या. पोटाला थंडावा मिळेल.
३. योग्य तेवढी झोप घ्या. शरीराला आरामाची गरज असते. पाळीच्या दिवसात अनेक प्रक्रियांमधून शरीर जात असते.
४. भरपूर पाणी प्या. पोट साफ नसेल तरी पाळीचा त्रास वाढतो. पाण्यामुळे पोट साफ होते. शरीर हायड्रेटेड राहते.
५. खूपच त्रास होतो तेव्हा, गरम पाण्याची पिशवी वापरून शेक घ्या. गोळी घेऊ नका.
६. उष्ण पदार्थ टाळा. चार दिवस पित्तकारक काही खाऊ नका. शरीरातील उष्णता आधीच जास्त असते.
७. आकाराने जरा मोठे असेच पॅड वापरा. आजकाल पिरिएड पॅन्टीज् मिळतात. बाहेर जाताना त्या वापरू शकता. वेळोवेळी पॅड बदला. त्याची अँलर्जी उठू शकते.