ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

Updated:August 14, 2023 14:51 IST2023-08-11T19:20:07+5:302023-08-14T14:51:07+5:30

Bathing in fever should we take bath in fever or not : हेल्थ एक्पर्ट्सच्या मते फिव्हर म्हणजेच ताप आल्यानंतर अंघोळ केल्यानं शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही पण ताप असताना अंगदुखी, विकनेस येतो त्यामुळे बऱ्याच जणांची अंघोळ करण्याची जराही इच्छा होत नाही.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक आजारांचा प्रसार होतो. मलेरिया, डेग्यू, चेस्ट इन्फेक्शन असे आजार वाढतात. पावसाळ्यात व्हायरल फिव्हरसुद्धा पसरतो. आजार कोणताही असो पहिलं लक्षण म्हणजे ताप.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

आजारी पडल्यानंतर ताप, अंगदुखी ही लक्षणं दिसून येतात. ताप आल्यानंतर आंघोळ करायची की नाही असा प्रश्न पडतो.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

हेल्थ एक्पर्ट्सच्या मते फिव्हर म्हणजेच ताप आल्यानंतर अंघोळ केल्यानं शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही पण ताप असताना अंगदुखी, विकनेस येतो त्यामुळे बऱ्याचजणांची अंघोळ करण्याची जराही इच्छा होत नाही.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

तुम्ही ताप असताना अंघोळ करू शकता फक्त थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरा. कारण कोमट पाण्यानं अंघोळ केल्यानं मांसपेशींना आराम मिळतो. शरीराचं वाढलेलं तापमानही कमी होतं.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

रोज अंघोळ करण्याची सवय असते त्यांना ताप असेल तरीही अंघोळ करण्याची इच्छा होते. अशावेळी एक स्वच्छ टॉवेल गरम पाण्यात बुडवा आणि या पाण्यानं अंग पुसा.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

यामुळे ताप कमी होईल आणि मांसपेशींनाही आराम मिळेल. थंड पाण्यात टॉवेल बुडवू नका अन्यथा जास्त थंडी वाजून ताप वाढेल.

ताप असेल तर आंघोळ करायची नाही? डॉक्टर सांगतात, ताप लवकर कमी व्हायचा असेल तर..

गोळ्यांमुळे बराच घाम आलेला असतो अशावेळी अंघोळ न करता राहिल्यानं अंग जास्त चिकट वाटतं. म्हणूनच कोमट पाण्यानं अंघोळ करणं हा उत्तम पर्याय आहे.